Toyota Upcoming Electric Cars : पेट्रोलची चिंता सोडा! टोयोटा आणणार 1200 रेंज देणारी कार, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toyota Upcoming Electric Cars : भारतीय बाजारात आता शानदार फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच होऊ लागल्या आहेत. त्यापैकी काहींच्या किमती खूप जास्त असतात. अशातच आता टोयोटा देखील आपली नवीन कार लाँच करणार आहे.

जी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. ज्यात ग्राहकांना 1200 रेंज पाहायला मिळेल. कधी लॉन्च होणार आणि काय आहेत तिची फीचर्स? जाणून घ्या सविस्तर माहिती. त्याशिवाय सॉलिड-स्टेट बॅटरी तंत्रज्ञान मिळेल. अनेक दिवसांपासून कंपनी यावर काम करत आहे.

मिळेल सॉलिड-स्टेट बॅटरी तंत्रज्ञान

अनेक दिवसांपासून कंपनी सॉलिड-स्टेट बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत असून या जपानी कंपनीने या दिशेने खूप प्रगती केली आहे. त्याचा परिणाम असा होईल की कंपनी 2028 पर्यंत सॉलिड-स्टेट बॅटरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करू शकेल. सध्याच्या लिथियम आयन बॅटरीच्या तुलनेत, नवीन बॅटरीमध्ये द्रवपदार्थाऐवजी घन इलेक्ट्रोलाइट्स पाहायला मिळतील.

असे मानले जात आहे की पहिल्या पिढीच्या सॉलिड स्टेट बॅटरीने सुसज्ज असणाऱ्या या कारची बॅटरी एका चार्जवर 1200 किलोमीटरपर्यंत धावू शकते. सर्वात महत्त्वाची म्हणजे ही बॅटरी अवघ्या 10 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

रेंजची संपेल चिंता

कंपनी येत्या काळात आपल्या बॅटरी तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त काम करेल. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, आगामी काळात ही कंपनी अशा इलेक्ट्रिक कार सादर करेल. ज्यांची रेंज एका चार्जवर 1500 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे.

सॉलिड-स्टेट बॅटरीने सुसज्ज असणाऱ्या या इलेक्ट्रिक कारची किंमतही तुलनेने परवडणारी असणार आहे, असे कंपनीचे मत आहे. भविष्यात, खूप कमी किमतीत अधिक बॅटरी रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी येत आहेत, ज्या केवळ पर्यावरणपूरक नसून किफायतशीर देखील असणार आहे.

या वर्षी कंपनीने त्‍याची प्रीमियम इलेक्ट्रिक SUV bZ4X शोकेस करण्यात आली होती, जी पुढील वर्षी लॉन्‍च केली जाईल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लुक-फीचर्स आणि बॅटरी रेंजच्या बाबतीत खूप दमदार असणार आहे.