नियमांचे उल्लंघन : तब्बल सहा कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  पोलिस प्रशासनाने जिल्हाभर वेगवेगळ्या कारवाया करत तब्बल सहा कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाख १९ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोना काळात विविध कारवाया जिल्ह्यात करण्यात आल्या.

सरकारने नियम लावून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झाले. जिल्हा पोलिस प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात धडक कारवाई मोहीम हाती घेतली होती. विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे तसेच संचार बंदीचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या होत्या.

दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलिसांनी २ लाख १९ हजार ३६५ केसेस दाखल केल्या. दुसरी लाट ही १९ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. कलम १८८ अंतर्गत या कारवाया केल्या. ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले, अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले.

१९ फेब्रुवारी ते ३१ मार्च या अखेरपर्यंत ५३ हजार १८ केसेस दाखल करण्यात आल्या असून १ लाख २१ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला. एप्रिल ते ३१ मे या काळात ९७ हजार २२ केसेस दाखल केल्या असून ३ कोटी २३ लाख ७० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

एक जून ते २५ जून अखेर ३५ हजार १७ केसेस दाखल केल्या असून १ कोटी ५ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. २६ जून ते आजपर्यंत ३४ हजार ३०८ केसेस दाखल केल्या असून १ कोटी ३९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. आतापर्यंत पोलिसांनी जिल्ह्यात ६ कोटी ६० लाख ५६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.