Vivo Smartphone Offer : सर्वात मोठी सेल! Vivo च्या फोनवर होईल हजारोंची बचत, MRP पेक्षा सवलतीत करा खरेदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo Smartphone Offer : सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच होऊ लागले आहेत. ज्यात तुम्हाला वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळतील. मागणीमुळे सर्वच स्मार्टफोनची किंमत खूप वाढली आहे.

तुम्ही कमी बजेटमध्ये एक मजबूत फोन खरेदी करण्याच्या तयारीत असल्यास तर Vivo Y17s तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. या फोनवर सेलमध्ये 22% डिस्काउंट मिळत असून डिस्काउंटनंतर त्याची किंमत 15,999 रुपयांवरून 12,499 रुपये इतकी झाली आहे. बँक ऑफरमध्ये 1249 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सवलत मिळेल. तसेच हा फोन 11,750 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करू शकता. जाणून घ्या Vivo Y17s या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये 4 GB विस्तारित रॅमचे फीचर देत आहे. त्यामुळे या फोनची रॅम गरजेनुसार 8 GB पर्यंत वाढते. गरज पडली तर ग्राहकांना मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी वाढवता येते.

फोनचा डिस्प्ले उत्तम असून यामध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा HD IPS LCD पॅनेल देण्यात आला आहे, जो 120Hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 840 nits आहे.

कंपनीच्या या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट दिला आहे. यामध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप असून त्यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल बोकेह सेन्सर असेल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा देत असून बॅटरी 5000mAh इतकी आहे.

जी 15 वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करेल. यात ड्युअल सिम, जीपीएस,ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 देण्यात आला आहे.