खरं काय! 5 क्विंटल बियाण्यातून मिळवले 129 क्विंटल बटाटे; निळे बटाटे ठरू शकते शेतकऱ्यांसाठी वरदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- अलीकडे देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात बदल घडवून आणला जात आहे. शेतकरी बांधव (Farmers) सध्या पीक पद्धतीत मोठा बदल करीत आहेत.

शेतकऱ्यांचा पीकपद्धतीत केला गेलेला प्रयोग त्यांच्यासाठी जणू काही वरदानच सिद्ध होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे.

मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील शेतकऱ्यांनी देखील पीक पद्धतीत मोठा बदल केला असून येथील शेतकरी शेती क्षेत्रात एक पाऊल पुढे गेले आहेत.

राज्यातील मुरेना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निळ्या कलरच्या बटाट्याची यशस्वी शेती करून दाखवली आहे. या निळ्या कलरच्या बटाट्यांना शेतकरी बांधवांनी नीळकंठ असे नाव देखील ठेवले आहे. निळकंठ बटाट्याची शेती करून येथील शेतकरी बांधव चांगला नफा प्राप्त करीत आहेत.

मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्हा (Muraina District) बटाट्याच्या लागवडीसाठी फार पूर्वीपासून विख्यात आहे, असे असले तरी या जिल्ह्यात पहिल्यांदाच निळ्या रंगाच्या बटाट्याची लागवड करण्यात आली आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुरैना जिल्ह्यातील संता गावातील शेतकरी गिरराज मुदगल यांनी शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केला आहे.

या शेतकऱ्याने बटाटा लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि नवा प्रयोग करत फुकरी जातीच्या नीलकंठ बटाट्याची लागवड (Potato Cultivation) केली आहे.

हा बटाटा खुपच खास आहे कारण की या जातिचा बटाटा सामान्य बटाट्यापेक्षा अधिक उत्पादन देतो. यासोबतच आजकाल या बटाट्याची मागणीही अधिक वाढू लागली आहे, कारण की हा निळ्या रंगाचा बटाटा आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे.

मुरैना विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतकरी गिरराज मुदगल यांनी आपल्या शेतात नीळकंठ बटाट्याची लागवड करण्याचा विचार केला.

यासाठी गिरराज मुदगल यांनी ग्वाल्हेर येथील बटाटा संशोधन केंद्रातून 5 क्विंटल नीलकंठ बटाट्याचे बियाणे आणले. त्यानंतर त्यांनी पाच बिघे जमिनीत हे बियाणे पेरले. या शेतकऱ्याला बटाटा लागवडीतून 129 क्विंटल बटाट्याचे उत्पादन झाले आहे.

म्हणजेच अवघ्या 10 पोती बियाण्यात 258 पोती नीलकंठ बटाट्याचे उत्पादन झाले आहे. हे पाहून गावातील शेतकरी अचंबित झाले आहेत.

आता गावातील इतर शेतकरी देखील नीलकंठ बटाटा लागवड करू लागले आहेत. या बटाट्याला सामान्य बटाटा पेक्षा अधिक किमत मिळत असल्याने शेतकरी बांधव यांच्या लागवडीकडे वळले आहेत.

सामान्य बटाटा 10 ते 12 रुपये प्रति किलो या दराने विकला जातो मात्र नीलकंठ बटाटा तब्बल 20 रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांसाठी या जातीच्या बटाट्याची शेती फायदेशीर ठरत आहे.