Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? जाणून घ्या आजचे दर……..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर (crude oil price) प्रति बॅरल 100 डॉलरच्या आसपास आहे. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत राहिल्यास राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol and diesel prices) आज 10 ऑगस्टलाही कोणताही बदल झालेला नाही.

पोर्ट ब्लेअरमध्ये (port blair) सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलची किंमत 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

आयओसीएलच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबई महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल अजूनही सर्वाधिक महाग आहे.

राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरही वेगवेगळे आहेत. तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे (sms) तुम्ही दररोज भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.