नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणे होणार महाग; जाणून घ्या नवे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-   1 जानेवारी 2022 पासून बँका एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहार 20 रुपयांऐवजी 21 रुपये व्यवहार शुल्क आकारतील.(ATM Service)

सध्या बँका ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी देतात. मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर बँका पैसे काढण्यासाठी 20 रुपये आकारतात.

पण 1 जानेवारीपासून सहाव्यांदा पैसे काढल्यावर तुम्हाला 21 रुपये शुल्क द्यावे लागेल आणि त्यावर कर जोडावा लागेल. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे शिल्लक रक्कम तपासण्यापासून ते मिनी स्टेटमेंट किंवा पिन बदलण्यापर्यंत सर्व गैर-आर्थिक व्यवहार विनामूल्य राहतील.

सध्या, 6 मेट्रो शहरांमध्ये इतर बँक एटीएममधून पैसे काढल्यावर, आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसह पहिले 3 व्यवहार पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

तर बिगर मेट्रो शहरांमध्ये 5 एटीएम व्यवहार मोफत करता येतात. यानंतर, मेट्रो शहरांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहारासाठी 20 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहार म्हणून 8.50 रुपये द्यावे लागतील.

परंतु 1 जानेवारीपासून नवीन दर लागू झाल्यानंतर बँकेच्या ग्राहकांना 5 व्या व्यवहारानंतर आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 21 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये द्यावे लागतील. बँकांनी त्यांच्या वेबसाइटवर 1 जानेवारी 2022 पासून एटीएम व्यवहार शुल्कात वाढ झाल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.