“तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात, परबांनो, बॅग भरा. तयारी करा”; किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात गेले काही दिवस झाले केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडी अटक केली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांना इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, खरमाटे आणि सचिन वाझेंकडून (Sachin Waze) पैसे घेतले आणि रिसॉर्ट बांधला गेला. कोव्हिडच्या नावाखाली लॉकडाऊन केला आणि घोटाळा केला. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माझा रिसॉर्टशी काहीच संबंध नाही असं अनिल परब गेल्या सहा महिन्यांपासून रोज बोलत आहेत. परबांनो, मोदी सरकारने याचिका दाखल केली आहे. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. ही केंद्र सरकारची याचिका आहे.

कोर्टाने त्याची दखल घेतली आहे. येत्या 16 एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे परबांनो, बॅग भरा. तयारी करा, असा इशारा सोमय्यांनी अनिल परब यांना दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्याबाबतही भाष्य केले आहे. ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी ज्या शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. घोटाळा केला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत.

त्यांच्या कारनाम्यांवरील कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यांनी घोटाळे केले, आम्ही त्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली. केंद्राने तक्रारीची दखल घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

एकूण 158 कोटींचा घोटाळा आहे. आता ईडी, कंपनी मंत्रालय आणि आयटी विभाग कारवाई करू शकतात असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियावरही आरोप केला आहे.

पवार कुटूंबियांना ग्लिसरीनचा सप्लाय यायचा म्हणून ते रडायचे. पुढच्या आठवड्यात जरंडेश्वर साखर कारखान्याचे 27 हजार शेतकरी मुंबईत येणार आहेत. हे शेतकरी ईडी कार्यालयात जाणार आहेत.

अजित पवार, शरद पवार यांनी घरच्या महिलांचा घोटाळ्यासाठी वापर केला. पवार परिवार शेतकऱ्यांना लुटणारं कुटूंब आहे. असा आरोपही किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियांवर केला आहे.