‘तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली’; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टोला लगावला होता, मात्र त्यांच्या या विधानाला आता प्रतिउत्तर मिळाले आहे.

मुंडे बहीण-भावात सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकतेच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली होती.

त्यावरच आता खासदार प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचे सांगत त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.

त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा या विधानावर काय बोलतील हे लवकरच समजेल. मात्र, बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरुन बहीण भावातील हा वाद अजूनच चिघळत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. असा टोला त्यांनी लगावला होता.

पुढे ते म्हणाले होते की, समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका.

बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका. अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली होती.