Benefits Of Tomato Juice : सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूस पिण्याचे 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Benefits Of Tomato Juice : भारतातील प्रत्येक घरात टोमॉटो आढळतो, प्रत्येक भाजीसाठी टोमॉटोचा वापर केला जातो. टोमॅटोचे सेवन आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जाते. टोमॅटोचे सेवन अनेक आरोग्य समस्यांवर मात करते. आज आपण टोमॅटोच्या फायद्यांबद्दलच जाणून घेणारआहोत. चला तर मग…

भाज्यांना चव देण्यासाठी असो किंवा आपली आवडती चटणी बनवण्यासाठी, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टोमॅटो वापरतो. अनेकांना टोमॅटो सूपही प्यायला आवडते. यात कॅलरीज कमी आहेत आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे देखील भरपूर आहेत. पण तुम्ही कधी टोमॅटोचा रस घेतला आहे का?

तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी एक कप टोमॅटोचा रस प्यायला तर ते तुमच्या आरोग्याला खूप फायदेशीर ठरू शकते? होय, टोमॅटोचा रस अनेक आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. तसेच यामध्ये लाइकोपीन, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटकही चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

टोमॅटोचा रस शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम पेय आहे. पण बर्‍याच लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो की निरोगी राहण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस घरी कसा बनवायचा? तसेच, नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करण्याचे काय फायदे आहेत? या लेखात आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस पिण्याचे फायदे !

-टोमॅटोचा रस उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

-याचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

-शरीराच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

-यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि चयापचय क्रियाही वाढते.

-हे शरीरातील साचलेली घाण काढून टाकण्यास आणि शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते.

-ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे वजन कमी करण्याचे उत्तम पेय आहे.

-सकाळी याचे सेवन केल्याने शरीर ऊर्जावान बनण्यास मदत होते.

-हे तुमचे पोट सहज साफ करण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि आतड्याची हालचाल सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

टोमॅटोचा रस कसा बनवायचा ?

यासाठी तुम्हाला फक्त काही ताजे टोमॅटो चांगले धुवावे लागतील, त्यात थोडी कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा ज्युसरमध्ये घालावा लागेल. त्याचा रस तुम्ही गाळून पिऊ शकता. चवीला तुम्ही त्यात लिंबाचा रस घालू शकता.

टीप : लक्षात ठेवा की रिकाम्या पोटी टोमॅटोचा जास्त रस पिऊ नका. तुमच्यासाठी फक्त एक कप रस पुरेसा आहे. कारण ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात.