Government Schemes : सरकारकडून दरमहा मिळणार 5 हजार रुपये पेन्शन, फक्त करा ‘हे’ काम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Atal Pension Yojana : भारतात सध्या एका पेक्षा एक योजना चालवल्या जात आहेत. या योजना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बाजरात आणल्या गेल्या आहेत. मोदी सरकराची अशीच योजना लोकांना दरमहा 5,000 रुपये पेन्शनचा लाभ देत आहे. सरकराची ही योजना कशी काम करते आणि येथे कोण गुंतवणूक करू शकतो, चला जाणून घेऊया…

भारतात अशा अनेक उत्कृष्ट योजना चालवल्या जात आहेत, ज्यात सहभागी होऊन तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. जर तुमच्याकडे काही काम नसेल आणि तुम्हाला मासिक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम आहे.

या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल, अशास्थितीत तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे केंद्र सरकारकडून चालवली जाणारी अटल पेन्शन योजना.

जर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन घ्यायची असेल, तर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

अटल पेन्शन योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी !

केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी अटल पेन्शन योजना सर्वांसाठी वरदान ठरली आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भरघोस उत्पन्न मिळवू शकता. लोकांच्या उन्नतीसाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरु केली होती.

जर तुम्ही या योजनेत सहभागी होण्याचा विचार करत असाल तर किमान वय १८ ते कमाल ४० वर्षे पाहिजे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दररोज ७ रुपये जमा करावे लागतील. म्हणजे दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील, ही गुंतवणूक तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत करावी लागेल. लक्षात घ्या वयानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढते. ६० वर्षानंतर तुम्हाला या योजनेत दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळते.

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा लाभ अनेकांना मिळू शकतो. तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन खाते उघडू शकता. येथे तुम्हाला बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक आणि आधारसह इतर माहिती द्यावी लागेल. यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.