Useful Home Hacks : तुमच्या घरात पाली आणि झुरळ वाढले असतील तर ‘हा’ उपाय कराच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Useful Home Hacks: घरामध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या कीटकांचा विचार केला तर यामध्ये आपल्याला मुंग्या तसेच पाली व झुरळ यांचा वावर प्रामुख्याने दिसून येतो. बऱ्याचदा घर कितीही टापटीप किंवा स्वच्छ राहिले तरी देखील पाल आणि झुरळ बऱ्याचदा आपल्याला आढळून येतात. यामध्ये जर स्वयंपाक घरामध्ये अन्नाचे कण जरी दिसून आले तरी देखील या ठिकाणी झुरळ तुम्हाला बघायला मिळतात. झुरळ आणि इतर काही मुंग्यांसारख्या किटकांचा विचार केला तर यांचा नायनाट करण्यासाठी किंवा असले कीटक घरांमध्ये येऊ नये याकरिता बाजारामध्ये अनेक प्रकारचे औषधे देखील मिळतात.

परंतु तरीदेखील  त्यांचा नायनाट अपेक्षित प्रमाणात होताना दिसून येत नाही. तसेच काही स्प्रे देखील बरेच जण वापरतात. या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मुंग्या किंवा इतर कीटक दूर निघून जावेत याकरिता  काही उपाय स्वतः करणे जास्त महत्त्वाचे ठरते. यामध्ये सगळ्यात नुकसानदायक ठरू शकेल अशी पाल असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण झुरळ आणि इतर कीटक व पाल यांना दूर पळवण्यासाठी चे काही महत्त्वाचे आणि सोपे उपाय बघणार आहोत.

 कराल हे उपाय तर चुटकीसरशी दूर जातील पाली

1- कॉफी पावडरचा वापरपालींना जर घरातून दूर पळवायचे असेल तर कॉफी पावडर हा एक रामबाण उपाय आहे. कॉफी पावडरचा वापर करताना या पावडरमध्ये तंबाखू मिसळून घ्यावी व या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवाव्यात. तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाली फिरताना दिसतात अशा ठिकाणी ही पावडर शिंपडून द्यावी. या मिश्रणाच्या तीव्र वासामुळे पाली दूर पळतात किंवा घरातून निघून जातात.

2- लाल मिरचीचा वापर या उपायांमध्ये पाण्यामध्ये लाल मिरची आणि काळी मिरी यांचे योग्य प्रमाण घेऊन योग्य मिश्रण करून घ्यावे. त्यानंतर घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये या लाल मिरचीच्या पाण्याची फवारणी करून घ्यावी. याच्या तीव्र वासामुळे देखील पाली घरातून दूर पळतात. परंतु लाल मिरचीचा स्प्रे करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

3- थंड पाण्याचा वापर– तुम्हाला जर घरामध्ये कुठेही पाल दिसली आणि तिच्यावर जर तुम्ही थंड पाणी शिंपडले तरी देखील पाल पळून जाते.

4- कांदा लसणाचा वापर जर तुम्ही कांदा आणि लसणाच्या पाकळ्या दाराजवळ किंवा खिडक्यांच्या जवळ ठेवला तरी पालींना घरातून दूर पळवण्यासाठी हा उपाय रामबाण आहे. कांदा आणि लसणाचा जो काही तिखट वास असतो तो पाली सहन करत नाही व लगेच पळून जातात.

5- काळी मिरीचा वापर घरामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाली दिसून येतात अशा ठिकाणी काळी मिरीची पावडर पाण्यामध्ये मिसळून घ्यावी व हे पाणी ज्या ठिकाणी पाली दिसतात त्या ठिकाणी शिंपडावे. त्यामुळे देखील पाली घरातून निघून जातात किंवा लांब राहतात.

 झुरळ तसेच मुंग्या इतर कीटक दूर पळवण्यासाठीचा उपाय

घरामध्ये असलेल्या लाल मुंग्या किंवा इतर कीटक व झुरळ तर तुम्हाला दूर पळवायचे असेल तर याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लिंबू चिरून घालावे व त्यामध्ये डांबराच्या गोळ्या आणि एक ग्लास पाणी टाकावे. याचे व्यवस्थित मिश्रण केल्यानंतर त्याची पेस्ट बनवावी व त्यानंतर ती गाळून एका डब्यात काढून घ्यावी. यामध्ये एक चमचा  बेकिंग सोडा, एक चमचाभर डिटर्जंट पावडर आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यावे.

नंतर तयार झालेल्या या द्रावणामध्ये कापसाचा बोळा बुडवून घ्यावा व ज्या ठिकाणी झुरळ आणि पाली तसेच मुंग्या व इतर कीटक येत असतील त्या ठिकाणी ठेवावा. या मिश्रणाच्या जो काही तीव्र वास येतो त्यामुळे मुंग्या तसेच इतर कीटक देखील निघून जातात. तसेच हे द्रावण तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवले आणि ठिकठिकाणी जर त्याची फवारणी केली तर कीटक दूर होतात व मुंग्या देखील येत नाहीत. अशाप्रकारे तुम्ही अगदी छोट्या छोट्या उपायांच्या माध्यमातून घरातील पाल आणि झुरळ व मुंग्यांसारखे कीटकांचा बंदोबस्त करू शकतात.