‘त्या’ मृत्यूप्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करावा : दराडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : राज्यातील कोलमडलेली शासकीय आरोग्य सेवा वाला राज्य सरकार जाबदार असून, सरकारमधील आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि राज्यातील विविध शहरातील असलेल्या

शासकीय रुग्णालयांतील मृत पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.

बुधवारी शिवसेनेच्या वतीने पाथर्डी येथील तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने करुन आरोग्यमंत्र्यांनी राजीनामाची मागणी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी तालुकाप्रमुख भगवान दराडे,

शहरप्रमुख भाऊसाहेब धस, ‘भाऊसाहेब निमसे, रामकिसन भिसे, अंकुश आव्हाड, केशव खेडकर, शिवाजी माळी, ओंकार गायकवाड, बबन शेळके, आदम पठाण, संतोष वारंगुळे, रवी औटी, गौरव एडके, एकनाथ आघवणे, साहेबराव काळे, नानाभाऊ पडळकर,

आदर्श काकडे, सुनिल कराळे, गोविंद कराळे, आदी उपस्थित होते. या सरकारचं करायचं काय.. खाली मुंडक वर पाय.. औषधाचा पुरवठा झालाच पाहिजे.. निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो… आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.. आशा प्रकारे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून कोलमडलेल्या आरोग्यवस्थेचा जाहीर निषेध व्यक्त केला.

या वेळी भगवान दराडे म्हणाले की, शासनाच्या हलगर्जी पणामुळे राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा जीव गेला आहे, त्यामुळे या हत्येस सरकार जबादर आहे. शासकीय रुग्णालयांतील रुग्णांचा गोळ्या औषधांअभावी मृत्यू झाला आहे.

ही औषधे कुठे जातात? सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडले असून, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, लोकांच्या मृत्यूस हे कारणीभूत असून, यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार मुरलीधर बागुल यांना निवेदन देण्यात आले.