मोठी बातमी : देशात साखर गाळपात महाराष्ट्र अव्वल स्थानी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Marashtraah News  :- साखर कारखाने बंद होऊ लागले; तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे.

त्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होऊ लागले असले तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला असला तरी देशातील एकूण उत्पादनापैकी 108 लाख टन साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झाले आहे.

देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातच साखरेचे उत्पादन अधिक होते. हंगामाच्या सुरवातीपासूनच साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेत.

गतवर्षी मार्च महिन्यात राज्यात 94 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ऊसाच्या क्षेत्रात वाढ तर झालीच पण अधिकचा उतारा पडत असल्याने उत्पादन वाढले आहे.

सध्या राज्यात 184 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप हे चालूच आहे. तर अतिरिक्त उसामुळे हंगामाचा कालावधीच वाढला नाही तर साखरेचे उत्पादनही वाढले आहे.

तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तर याच विभागातील 13 साखर कारखान्यांची धुराडीही बंद झाली आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्यात ऊस अजूनही फडातच आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप पूर्ण होत नाही.

तोपर्यंत कारखाने सुरुच ठेवण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिले आहेत. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडणार हे नक्कीच आहे.

एकट्या महाराष्ट्रात मार्चपर्यंत 108 लाख टन साखरेची निर्मिती झालेली आहे.तर देशात जवळपास 516 साखर कारखान्याच्या माध्यमातून मार्चपर्यंत 283 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा ऊसासाठी वातावरण पोषक राहिल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे.