Hyundai Exter SUV : बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी येतेय Hyundai ची नवीन SUV, स्टायलिश लूकसह मिळतील शक्तिशाली फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Exter SUV : जर तुम्ही Hyundai Motors ची नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण लवकरच बाजारात एक शक्तिशाली SUV लॉन्च होणार आहे.

Hyundai ची ही नवीन मायक्रो SUV Exter आहे. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तमोत्तम फीचर्स तसेच अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळणार आहे. यासोबतच कंपनी या कारमध्ये खूप चांगले सेफ्टी फीचर्स देखील देऊ शकते. तसेच यामध्ये मजबूत इंजिनही देण्यात येणार आहे.

Hyundai Exter 2023 डिझाइन

नवीन Hyundai कार कंपनीच्या K1 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, ज्यावर Hyundai Santro देखील आधारित होती. याला 2450 mm चा व्हीलबेस मिळू शकतो. या कारची लांबी 3.8 मीटर असेल. यासह, नवीन Hyundai Xter ची लांबी सुमारे 3.8 मीटर असेल, जी Casper SUV च्या 3.6 मीटरपेक्षा थोडी जास्त आहे.

नवीन मॉडेल लूकच्या बाबतीत ह्युंदाई कॅस्परपेक्षा बरेच वेगळे असेल. एकात्मिक एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प युनिट आणि एच-आकाराचे टेल-लॅम्प्स, शार्क फिन अँटेना सह Hyundai ग्रिल मिळणे अपेक्षित आहे.

Hyundai Exter 2023 Features

या कारमध्ये अनेक कूल फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. यामध्ये, तुम्हाला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि मोठ्या टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह लेयर्ड डॅशबोर्ड पाहायला मिळेल.

यासोबतच अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रिक सनरूफ, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक एसी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यासह इतर अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

Hyundai Exter 2023 Engine

कंपनीला या कारमध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन मिळेल, जे 81bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळू शकतो.

यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सीएनजी पॉवरट्रेन पर्याय देखील असेल. वेन्यूसारखे 1.0-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय देखील असू शकतो. मात्र या कारच्या किंमतीबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.