दहावीच्या विद्यार्थ्यंसाठी महत्वाची बातमी…परीक्षेचा अर्ज भरला नसेल तर

 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांनंतर राज्यात ऑफलाईन पद्धतीने बारावीच्या परीक्षा होत आहे. आता लवकरच दहावीच्या परीक्षा देखील होणार आहे.

दरम्यान यातच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा दिली आहे.

राज्य मंडळाच्या परिपत्रकात नेमके काय म्हंटले आहे? जाणून घ्या इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे. परीक्षेचा अर्ज नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने १४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच भरण्याची सुविधा उपलब्ध राहील.

नंतर अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असलेले संकेतस्थळ बंद करण्यात येईल, याची विद्यार्थी आणि शाळांनी नोंद घ्यावी. तसेच मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसण्यासाठी खासगी विद्यार्थी म्हणून

नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या, पण प्रस्तावात त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० मार्च पर्यंत त्रुटींची पूर्तता करून १२ मार्च पर्यंत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.