गुन्हेगार नव्हे हे तर जादूगर!! कारागृहातील कैद्यांनी शेतीतून मिळवले तब्बल नऊ कोटींचे उत्पन्न; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra news :- कारागृहातील कैदी कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामुळे कारागृहात डांबलेले असतात या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे योग्य ते फळ मिळाले असते.

मात्र, कारागृहात या कैद्यांना पुन्हा एकदा समाजाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातात. या गुन्हेगारांनीच आता एक चमत्कार करून दाखवला आहे.

संपूर्ण राज्यातील कारागृहांच्या ताब्यात एकूण 330 हेक्‍टर शेतीयोग्य जमीन आहे. कारागृह प्रशासन या एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कैद्यामार्फत शेती करून घेत असते.

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील या कैद्यांनी तब्बल तीन वर्षात नऊ कोटींचे उत्पन्न मिळवून दिले आहे. यामुळे हे गुन्हेगार नव्हे हे तर जादूगर अशी प्रतिक्रिया उमटत आहे. कैद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या शेती क्षेत्रातील कार्यामुळे कारागृह प्रशासनाला चांगले आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

ज्या कैद्यांना शेतीमध्ये कसब आहे अशा कैद्यांना मजुरी देऊन कारागृह प्रशासन त्यांच्याकडून शेती करून घेत असते. केवळ शेतीच नव्हे उद्योग कारखाने इत्यादी कारागृह प्रशासनाने उभारले आहेत कैद्यांच्या कसबीनुसार त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची मुभा दिली जाते.

राज्यातील सर्व कारागृहात एकूण बावीस हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. यामध्ये जिल्हा व मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा देखील समावेश आहे.

जिल्हा व मध्यवर्ती कारागृहातील कच्चे कैदी तसेच शिक्षा झालेले इतर कैदी यांना शेती सोबतच इतर उद्योगधंद्यात कामाला ठेवले जाते. गेल्या काही वर्षांपासून कारागृह प्रशासन अंतर्गत येणाऱ्या शेतीयोग्य जमिनीत पावसाळी रब्बी आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली आहे.

या तिन्ही हंगामातून प्राप्त होणारे उत्पन्न कारागृह प्रशासनास फायद्याचे सिद्ध होत असून कारागृह प्रशासनाला यामुळे आर्थिक सुबत्ता लाभली आहे.

शेतीची योग्य ती कसब असलेल्या गुन्हेगारांकडून भाजीपाला वर्गीय पिके, फळबाग पिके, सोयाबीन, कापूस, तूर,ऊस, केळी इत्यादी पिकांची लागवड केली जाते. 2018 ते 2019 या आर्थिक वर्षात कारागृह विभागाने शेतीतून सुमारे चार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

2020 मध्ये देखील चार कोटीच्या आसपास उत्पन्न मिळाले होते. मात्र तदनंतर कोरोना काळात काही कैद्यांना घरी पाठवले असल्याने उत्पादनात घट झाली होती.

पुण्यामध्ये शेती व्यतिरिक्त शेतीपूरक व्यवसाय देखील कारागृह प्रशासनाकडून घेतला जात आहे. पुणे कारागृहात प्रामुख्याने सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येतो.

प्रत्येक पिकांचे देशी वाण पेरणीसाठी उपयोगात आणले जाते. विशेष म्हणजे या कारागृहात भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होते आणि या भाजीपाला वर्गीय पिकांसाठी कोणतेच रासायनिक औषध फवारले जात नाही.

याशिवाय शेतीपूरक व्यवसाय केला जातो यामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन याचा समावेश आहे. एकंदरीत, कैद्यांनी शेतीमध्ये आपली कसब ओळखून चांगले नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.