Maharashtra Rain Alert : दिलासा ! मान्सून वेळेआधीच दाखल, ‘या’ दिवशी राज्यात करणार एन्ट्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार देशातील काही भागात 22 मे रोजी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर मान्सून शुक्रवारी दाखल झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात पुढे सरकला आहे. यामुळे आता अंदमानमध्ये मान्सूनच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून साधारणपणे 22 मे रोजी अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून अंदमानच्या काही भागात तीन दिवस आधीच दाखल झाला आहे.

मात्र 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दरवर्षी 1 जूनला मान्सूनचा पाऊस सुरू होतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये तीन दिवस उशिराने दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

IMD नुसार पुढील 3 ते 4 दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

स्कायमेट या भारतातील पहिली खाजगी हवामान कंपनीच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 9 ते 15 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून 11 जूनपर्यंत मुंबईत दाखल होऊ शकतो. हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की केरळमध्ये मान्सून उशिरा सुरू झाल्याचा अर्थ मुंबईतही मान्सूनवर परिणाम होईल असे नाही.

ते म्हणाले की मान्सूनचे आगमन अनेक घटकांवर अवलंबून असते. गेल्या वर्षीही 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. मात्र, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा वेग आणि दिशा अचूकपणे सांगता येईल. आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे की भारतात यावर्षी सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सून आला हे कसं कळणार?

केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून सुरू होण्यास चार दिवस उशीर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभाची सामान्य तारीख 1 जून आहे. मात्र केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखेत बदल होण्यास अजूनही वाव आहे.

खरं तर IMD 10 मे पासून सुरू होणार्‍या पावसाचे निरीक्षण करते आणि लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकातील मंगळुरू येथील 14 हवामान केंद्रांपैकी 60 टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस 2.5 मिमी पावसाची नोंद झाली तर मान्सून दाखल झाला आहे अशी घोषणा केली जाते.

हे पण वाचा :- Aadhaar Card धारकांसाठी खुशखबर , सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा , आता ..