Maruti Suzuki Eeco : टोयोटा इनोव्हाला टक्कर देतेय मारुतीची ही 7 सीटर कार; कमी किंमतीत मिळतात शक्तिशाली फीचर्स; पहा किंमत
टोयोटा इनोव्हाची बाजारात खूप चर्चा आहे. मात्र आता या कारला टक्कर देण्यासाठी मारुतीची 7 सीटर कार तयार आहे.
Maruti Suzuki Eeco: मोठ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी लोक 7 सीटर कार खरेदी करतात. यामुळे देशात 7 सीटर कारची मागणी खूप वाढत आहे. यासोबतच लोकांना कमी किंमतीत अधिक फीचर्स मिळतात. यामुळे ही कार तुमच्या खिशाला परवडणारी आहे.
दरम्यान, जर तुम्हाला मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या सर्वात चर्चेत व स्वस्तात मस्त अशा 7 सीटर कारने कारबद्दल सांगणार आहे.
मारुती सुझुकी Eeco कंपनीची सर्वात छान 7 सीटर कार मानली जाते. या कारमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स आणि मजबूत पॉवरट्रेनही उपलब्ध करून दिली आहे. तज्ञांच्या मते, या कारने विक्रीच्या बाबतीत टोयोटा इनोव्हालाही मागे टाकले आहे. तसेच या कारची किंमतही खूपच कमी ठेवण्यात आली आहे.
मारुती सुझुकी इको
मारुती सुझुकी इको मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मार्च 2023 मध्ये या मस्त कारने टोयोटा इनोव्हालाही मागे टाकले आहे. जर आपण या कारच्या विक्रीवर नजर टाकली तर मार्च 2023 मध्ये या कारचे सुमारे 11,995 युनिट्स विकले गेले आहेत. एकूणच ही कार विक्रीत 8 व्या क्रमांकावर आहे.
मारुती सुझुकी Eeco वैशिष्ट्ये
कंपनीने या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्सही दिले आहेत. यात डिजिटल स्पीडोमीटर, एसी साठी रोटरी डायल, समोरील सीट, मॅन्युअल एसी आणि 12V चार्जिंग सॉकेट मिळते. यासोबतच या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये या कारमध्ये पाहायला मिळतात.
मारुती सुझुकी Eeco किंमत
कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 5.26 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 6.23 लाख रुपये खर्च करावे लागतील.