Monsoon Update: पाऊस आला रे….! राजधानी मुंबईत वरुणराजाचे आगमन, आज देखील बरसणार पाऊस; वाचा ताजा हवामान अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे मान्सून (Monsoon) मुंबईत 11 जून रोजी दाखल झाला असून आता राजधानी मुंबईतं मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी राजधानी मुंबईतील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळाली.

विशेष म्हणजे मुंबईच्या दादर, वांद्रे आणि मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली आहे. सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबईवासियांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

याशिवाय (Indian Meteorological Department) भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत आज देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस (rain) बघायला मिळणार आहे, तर पुढील आठवड्यापासून राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस (Monsoon news) पडण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून मोठे अल्हाददायक वातावरण बघायला मिळत आहे.

मुंबईत आज ढग दाटून येतील

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार (IMD), आज शुक्रवार, 17 जून रोजी राजधानी मुंबईत (Mumbai Weather Forecast) ढगाळ हवामान राहणार आहे आणि अधून-मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पावसामुळे तापमानात घट नोंदवली जात आहे. 

आज मुंबईचे कमीत कमी तापमान 24 अंश सेल्सिअस तर  जास्तीत जास्त तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानुसार मुंबईत 18 जूनपासून मुसळधार पाऊस पडणार असून 19 जूननंतर पावसाचा जोर अजूनच वाढणार आहे.

पावसामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचीही शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून 18 जून पासून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राजधानी मुंबईतं मोसमी पावसाने हजेरी लावली असल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे. शिवाय येत्या काही दिवसात मोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याने निश्चितच समाधानाचे वातावरण जनतेमध्ये बघायला मिळत आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास पुन्हा एकदा जोमात सुरू होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव आता पेरणी साठी आवश्यक तयारी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.