नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी; काय म्हणाले पांडे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणी सीबीआयकडून (CBI) पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना धमकावल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावले असून त्यांची तब्बल ६ तास कसून चौकशी करण्यात आली आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार आयुक्त पांडे यांनी देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना फोनवरून देशमुखांवरील तक्रार मागे घेण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. या घडामोडीनंतर देशमुख यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले व त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती.

यावेळी परमबीर सिंहांनी याचिका दाखल करत आपल्या विरुद्धचा तपास मागे घेण्यात यावा अशी मागणी करत त्यांनी संजय पांडे यांच्या सोबत झालेले संभाषण उघड केले आहे.

त्यामध्ये पांडे यांनी परमबीरसिंह यांना फोन करून पत्र मागे घेण्यास सांगितले, आणि जर त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्यात येतील असे म्हटले आहे.

यातून महाराष्ट्र सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय तपासापासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीबीआयकडून मुंबई उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.