नेवासे :- भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच नेवासे तालुक्यातील अनेक गावांत भाजप, सेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
मुरकुटे यांनी फेरी काढत देवदर्शन घेतले. भाजपची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित, अशी परिस्थिती असताना नेवासे तालुक्यात संदिग्ध वातावरण होते.
आमदार मुरकुटे यांना नाकारत भाजपचे तिकीट बदलले जाणार, नेवासे मतदारसंघ शिवसेनेला सोडणार अशा बातम्यांनी भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांत, तसेच मतदारांमध्येही संभ्रम निर्माण केला होता.
तथापि, आमदार मुरकुटे हे उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत होते. मंगळवारी भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार मुरकुटे यांनी नेवासे तालुक्याचे दैवत असलेल्या देवगडच्या दत्तात्रेयांचे दर्शन घेतले, तसेच शनिशिंगणापूरला जाऊन अभिषेक केला. त्यानंतर नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरातील पैसचे, ग्रामदैवत मोहिनीराज व बेलपिंपळगावच्या जागृत मारूतीचे दर्शन घेतले.
- सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत का? 24 कॅरेटचे खरेदी कराल की 22 कॅरेटचे? कोणते सोने सर्वात चांगले? वाचा माहिती
- Bombay High Court Bharti : गोल्डन चान्स! मुंबई उच्च न्यायालयमध्ये ‘या’ पदासाठी नोकरीची मोठी संधी, वाचा…
- हलक्या जमिनीत फळबाग लागवड करण्याची प्लॅनिंग असेल तर करा सिताफळाची लागवड! ‘या’ दोन जाती देतील भरघोस उत्पादन आणि मिळवाल लाखो रुपये
- NCS Mumbai Bharti : नोकरीच्या शोधात आहात? मग, वाचा ही बातमी
- उष्माघाताने हृदयविकाराचा धोका, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे तज्ञांचे आवाहन ! डॉक्टर म्हणतात ‘अशी’ घ्या काळजी