Pune News: पुण्यातील ‘हे’ 15 रस्ते होतील चकाचक!नागरिकांना मिळेल दिलासा,कोणत्या रस्त्यांची होणार कामे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News:- मुंबई असो किंवा पुणे किंवा महाराष्ट्रातील कुठलेही शहरे असो यामध्ये रस्त्यांवरील खड्डे, पावसाळ्यामध्ये तुंबणारे पाणी या समस्या खूप प्रकर्षाने उद्भवतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणामध्ये वाहतुकीला त्रास होतो व अशा खड्ड्यांमुळे बऱ्याचदा नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ देखील येते. याकरिता बऱ्याचदा पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम महानगरपालिकांच्या माध्यमातून केले जाते व यामध्ये देखील कितपत यश मिळते हा एक संशोधनाचा विषय आहे.

तसेच बरेच रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमणामुळे देखील ट्रॅफिक कोंडी होताना आपल्याला दिसून येते व ही देखील समस्या खूप मोठी आहे. अशाच प्रकारच्या काही समस्या पुणे महानगरपालिका हद्दीतील काही रस्त्यांच्या बाबतीत असून यातील 15 आदर्श रस्त्यांच्या कामाला महापालिकेच्या माध्यमातून आता मुहूर्त मिळाला असून 10 ऑक्टोबर पासून या रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे नक्कीच पुणेकरांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.

 पुण्यातील हे 15 रस्ते होणार चकाचक

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पुणे महानगरपालिकेच्या 15 आदर्श रस्त्यांच्या कामाला आता मुहूर्त मिळाला असून 10 ऑक्टोबर पासून या रस्त्यांचे कामे सुरू होणार असून या अगोदरच या रस्त्यांवरील अतिक्रमणे तसेच खड्डे बुजवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या होत्या व यामध्ये अधिकाऱ्यांकडून कामांमध्ये दिरंगाई झाली तर कारवाई केली जाईल अशा देखील त्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले होते.

यामध्ये मिशन पंधरा  महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असून या मिशन अंतर्गत पुणे शहरातील जे काही मुख्य 15 रस्ते आहेत त्यांना आदर्श रस्ते म्हणून घोषित केले जाणार असून त्या दृष्टिकोनातूनच त्यांचा विकास आणि देखभाल केली जाणार आहे. या मिशन अंतर्गत मुख्य रस्ते आणि शहरातील सर्व रस्त्यांची खड्ड्यांची दुरुस्ती  सातच दिवसात करण्यात यावी तसेच फुटपाथ दुरुस्ती तसेच रेलिंग दुभाजकांची दुरुस्ती, भूमिगत नाल्यांची दुरुस्ती इत्यादी कामे तातडीने करण्यात यावी अशा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला सूचना केलेल्या होत्या

परंतु त्या दृष्टिकोनातून कुठलेही काम झालेले नाही त्यामुळे महानगरपालिकाने आता ही कामे पावसाळ्यानंतरच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरातील या रस्त्यांची काय स्थिती आहे त्याबद्दल आढावा घेतला व त्यानंतर मिशन पंधरा मध्ये रस्त्यांची दुरुस्ती व इतर कामे 10 ऑक्टोबर पासून सुरू अतिक्रमण तसेच अनधिकृत पथारी दिसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना कडक कारवाई केली जाईल असा देखील इशारा आयुक्तांनी दिला आहे.

 मिशन पंधरा अंतर्गत कोणते रस्त्यांचा आहे समावेश?

या मिशन अंतर्गत पुण्यातील सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ रस्ता, कर्वे रोड, नगर रोड,पौड रस्ता तसेच सातारा रस्ता, सिंहगड रोड, बिबडेवाडी रोड, नॉर्थ मेन रस्ता, गणेश खिंड रोड व बाजीराव रस्ता इत्यादी रस्त्यांची कामे आता होणार असून ही रस्ते चकाचक होणार आहे. या अंतर्गत आता या रस्त्यांवरील खड्डे बुजवणे तसेच पादचरी मार्गाची दुरुस्ती, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन,

पावसाळी गटार दुरुस्ती तसेच पथदिव्यांची दुरुस्ती, जलवाहिनी किंवा सांडपाणी वाहिनी दुरुस्ती व नव्याने टाकणे, या रस्त्यांचे पुनर डांबरीकरण लवकर करण्यात येणार आहे.तसेच महत्त्वाचे म्हणजे या कामानंतर किमान तीन वर्षांपर्यंत कुठल्याही कामासाठी या रस्त्यांचे खोदकाम करण्यात येणार नाही.