Big Breaking ! आजपासून निवासी डॉक्टरांचा संप ! रुग्णालयाच्या सेवेवर होणार परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Breaking : राज्यातील निवासी डॉक्टर बुधवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. संपामुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांवर परिणाम होणार आहे.

मुंबईतील निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाला पाठिंबा दिला असला तरी या संपाचा महापालिका रुग्णालयांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन दशकांत राज्यात एमबीबीएस आणि पीजीच्या जागांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे; परंतु रुग्णालयातील वसतिगृहांच्या अडचणी काही सुटल्या नसल्याची गोष्ट अनेकदा निवासी डॉक्टरांनी सरकारच्या निदर्शनात आणून दिली.

मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी सांगितले की, वसतिगृहांच्या अडचणींसोबत स्टायपेंड वेळेवर न मिळणे आणि केंद्रीय वैद्यकीय संस्थांमध्ये ज्या पटीत स्टायपेंड दिले जाते त्या पटीत आम्हाला ते येथे दिले जात नाही.

या समस्यांबाबत आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारसमोर आमच्या मागण्या मांडत आहोत, मात्र आम्हाला केवळ आश्वासने मिळत आहेत. त्यामुळे बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. राज्यात एकूण ७ हजार निवासी डॉक्टर आहेत, मात्र यापैकी मुंबईतील महापालिका रुग्णालयांतील सुमारे तीन हजार निवासी डॉक्टर संपावर जाणार नाहीत.

महापालिका मार्डचे प्रतिनिधी डॉ. वर्धमान म्हणाले की, सेंट्रल मार्डच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार नाहीत.

सेंट्रल मार्डचे शुभम सोनी म्हणाले की, आमची मागणी आहे की, आम्हाला महिन्याच्या १० तारखेपर्यंत स्टायपेंड मिळावा, वसतिगृहाच्या सुविधा वाढवाव्यात आणि आम्हालाही केंद्रीय संस्थांप्रमाणेच स्टायपेंड देण्यात यावा.

प्राध्यापक पदभार स्वीकारतील
जे. जे. रुग्णालय समूहातील प्राध्यापक म्हणजेच विभागप्रमुख, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापक ओपीडी सांभाळतील. काही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जाऊ शकतात; परंतु आपत्कालीन सेवांवर परिणाम होणार नाही, असे जे. जे. रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.