संजय राऊत डरपोक, चोवीस तासाच्या आता माफी मागावी अन्यथा, कारवाई करणार; किरीट सोमय्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यातील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या विरुद्ध राऊत हा संघर्ष राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने आएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला आहे.

त्याचबरोबर मागच्या वीस दिवसापुर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा (Toilet scam) केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

यावर बोलताना सोमय्या म्हणाले, संजय राऊत हातात एकही कागद नसताना आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी कारण त्यांनी मेधा सोमय्या (Medha somaiya) यांचे चरित्रहनन केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) प्रवक्ता असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.

तसेच संजय राऊत डरपोक, ऊद्धव ठाकरे महाडरपोक आहेत. इडीचे चार अधिकारी आणि किरीट सोमय्या हजारो कोटींची वसूली केली आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक आरोप माझ्यावरती केले आहेत.

आत्ता त्यांना धडा शिकवण्यासाठी डिफमेशनची नोटीस पाठवली आहे असे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर बिकेसीत छाब्रिया यांचं ऑफिस, आणि बीकेसीतून बांद्रा इथे कुणाच्या खात्यात पैसे गेले याचीही चौकशी होणार आहे. हे मी जबाबदारीने बोलतोय असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट सांगितले आहे.

त्याचसोबत चोरीचा माल कुणाला मिळाला. लाभार्थी कोण याचा सीबीआय शोध घेणार आहेत. बीकेसी दहा बिल्डींगमध्ये कुणाचे फ्लॅट्स आहेत हे सुध्दा लवकरचं कळेल असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.