Sarkari Yojana: समाजातील ‘हे’ व्यक्ती होतील आता जमिनीचे मालक! शासन जमीन घेण्यासाठी देईल 100% अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांच्या आर्थिक उत्थानासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून आर्थिक व दुर्बल घटकातील नागरिकांना त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवन उंचावण्याकरिता अशा योजनांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो.

सामाजिक आणि आर्थिक समतोलाच्या दृष्टिकोनातून देखील या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता आपल्याला माहित आहे की समाजामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांचा उदरनिर्वाह हा शेतमजुरी करून चालतो. परंतु अशाच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे काही दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर आहेत त्यांना स्वतःची जमीन असावी या दृष्टिकोनातून आता शासन 100% अनुदान देणार आहे. याकरिता शासनाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून आता जमीन खरेदी करिता 100% अनुदान दिले जाणार आहे.

 शेत जमीन खरेदी करता मिळणार 100% अनुदान

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राज्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजुरांना आता शेतजमीन घेण्याकरिता 100% अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून  चार एकर कोरडवाहू आणि दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये आता काही सुधारणा करण्यात आलेल्या असून या अगोदर जमीन खरेदी करिता 50 टक्के अनुदान या माध्यमातून देण्यात येत होते. परंतु यामध्ये आता शासनाने वाढ केली असून शेतजमीन खरेदी करण्याकरता 100% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

म्हणजेच आता असे व्यक्ती स्वतःच्या जमिनीचे मालक होणार आहेत. याकरिता जे काही इच्छुक लाभार्थी आहेत त्यांना शासकीय रेडीरेकनरचा जो काही दर आहे त्याप्रमाणे शेत जमीन खरेदी करणे गरजेचे राहील.तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जो काही शासकीय रेडीरेकनरचा दर आहे त्या दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक किंवा संयुक्त मालकीची शेत जमीन असेल तर ती सामाजिक न्याय विभागात विक्री करता येणार आहे व अशा शेतकऱ्यांनी स्वतः समाज कल्याण कार्यालयात यासंबंधीचा अर्ज करणे गरजेचे आहे.

 काय आहे या योजनेसाठीच्या पात्रता?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती, दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर व त्या गावचाच रहिवासी असणे गरजेचे आहे. तसेच लाभार्थ्याचे वय किमान 18 ते कमाल 60 या दरम्यान असणे आवश्यक आहे. समजा जर संबंधित गावांमध्ये या योजनेसाठी पात्र लाभार्थी नसतील तर जवळच्या इतर गावातील  किंवा तालुकास्तरावरील जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची या योजनेसाठी निवड करण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत ज्या इच्छुकांना शेतजमिनीची विक्री करायची आहे अशा जमिनीच्या विक्रीचे प्रस्ताव सर्व विहित कागदपत्रांसह संबंधित व्यक्तीने समाज कल्याण कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.