मुलाने स्वतःच्या घरावर मारला लाखोंचा डल्ला… या ठिकाणी घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्याच राहत्या घराचे कुलूप तोडून मुलाने घरातून लाखो रुपयांचे सोनेलंपास केल्याची घटना नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर शहरात घडली आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौ. मंगल संजय डमरे त्यांच्यावर नाशिक येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

त्यांच्या सोबत आपणही हॉस्पिटलमध्ये असतांना मुलगा आतीष संजय डमरे याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

कपाटातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच 15 बी बी 5701, 5 हजार रुपयांचा मोबाईल, तीन घड्याळे असा एकूण 3 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

त्याला त्याचा मित्र सुरज वाघ व त्याची आई निकिता वाघ यांनी मदत केली. चोरी केलेले सोने त्यांनी नाशिक येथील सोनाराकडे विकले. या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आतीष संजय डमरे, सुरज वाघ,

निकिता वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहे. दरम्यान या चोरीची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment