या समाजाचे थेट नदीत अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा.या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर जवळील रेडी नदीतील पाण्यात अर्धनग्न होवून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले.

भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीतील ३६ व्या क्रमांकावर असलेले धनगर ( इंग्रजी ) हीच महाराष्ट्रातील जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध झालेले आहे.

शासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज हक्कापासून वंचित राहिला आहे. हाच हक्क मिळविण्यासाठी धनगर समाज एकवटला आहे.

जयमल्हार सेनेच्या वतीने गुरुवारी रेडी नदीत जयमल्हार सेनेचे दत्तात्रय वीर व रासापाचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, गणेश खंबरे यांच्या नेतुत्वाखाली भातकुडगांव मंडलातील कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होवून पाण्यात उतरून आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांचे भातकुडगाव मंडलाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कामगार तलाठी प्रदीप मगर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत कळविण्यात येतील असे आश्वासन दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment