तृतीयपंथी सपना अन् ढोलकी वादक बाळू अडकले विवाह बंधनात

 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- आज बीड जिल्ह्यात केवळ एकाच लग्नाची चारचा रंगली होती. ती म्हणजे सपना आणि बाळूची होय…आज बीडमध्ये तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह पार पडला.

समस्त बीडकरांच्या उपस्थितीत हा मोठ्या थाटात विवाह पार पडला आहे. बीडमध्ये राहणारे सपना आणि बाळू मागील अडीच वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये होते.

अडीच वर्षांनंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. मात्र या लग्नाला समाजात विरोध असल्यानं लग्न नेमकं कसं करावं, असा प्रश्न त्यांच्या समोर होता.

मात्र आज अखेर सामाजिक न्याय विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बँड, बाजा, वरात मिरवणूक लग्नाच्या अक्षदा आणि बीडचे ग्रामदैवत कन्कलेश्वर मंदिर परिसरात हा विवाह पार पडला आहे.

विवाह प्रसंगी सपना आणि बाळूला अनेक सामाजिक स्तरातून मदत करण्यात आली. संसार उपयोगी साहित्य मनी मंगळसूत्र याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांनी स्वीकारून मामाचे कर्तव्य पार पाडले.

सुरुवातीला या लग्नाला बाळूच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र या दोघांच्या प्रेमापुढे कुटुंबाला झुकावे लागले. आज विवाह बंधनात अडकल्यानंतर या दोघांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली.