सावधान : बिबट्या पुन्हा आलाय ! बिबट्याने हल्ला केला आणि….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बिबट्याचे संकट पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे, श्रीरामपूर तालुक्यात एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर तरुण जखमी झाला आहे. 

संजय भानुदास  लोखंडे राहणार बेलापुर खूर्द  वय ४७  हे सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मोटार सायकलवर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला.

या हल्ल्यामुळे ते मोटारसायकल वरुन खाली पडले बिबट्याने पुन्हा त्याचेवर झडप घालुन त्याना बाजुच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला या वेळी प्रसंगावधान राखुन संजयने आरडा ओरड केली संजयच्या आवाजाने आसपासचे नागरीक गोळा झाले.

त्यामुळे बिबट्याने तेथुन पळ काढला ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बेलापुर येथे दवाखान्यात दाखल केले तेथुन त्यांना श्रीरामपुर येथील दवाखान्यात हलविण्यात आले.

त्याच्या डोक्यावर गळ्याला अंगावर बर्याच जखमा झालेल्या आहे त्यांना ताताडीने अहमदनगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर