7th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल 44 टक्के वाढ? कशी असेल पगाराची रचना?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळावा याकरिता मागच्या महिन्यामध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% टक्क्यांऐवजी 46% इतका महागाई भत्ता मिळणार असून तो एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ झाली. यानंतर मात्र आता कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग आणि फिटमेंट फॅक्टर केव्हा वाढेल याबाबतची प्रतीक्षा असल्याचे सध्या चित्र आहे. जर सरकारच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टींना मंजुरी देण्यात आली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार हा 44% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन आणि भत्ते मिळत आहेत. साधारणपणे 2014 यावर्षी या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात येत असून याबाबत काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची निदर्शने देखील झालेली आहेत.

परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका नाही. परंतु 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग स्थापन केला जाऊ शकतो व त्याची अंमलबजावणी 2025-26 पर्यंत होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 फिटमेंट फॅक्टर वाढला तर कशी असेल पगाराची रचना?

समजा येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू केला तर फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ होईल. कारण कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये फिटमेंट फॅक्टर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कर्मचाऱ्यांच्या पगारावर महागाई भत्त्याचा जसा प्रभाव असतो तसाच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर फिटमेंट फॅक्टरचा देखील प्रभाव पडत असतो.

2014 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तेव्हा 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल करण्यात आले होते. तेव्हापासून 2.57% इतका फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांना लागू आहे. परंतु आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

सरकारने 3.68 टक्क्यांपर्यंत फिटमेंट फॅक्टर वाढवावा अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. समजा जर कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला किंवा फिटमेंट फॅक्टरची टक्केवारी वाढवली तर कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्यास यामुळे मदत होणार आहे.

समजा सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57% फिटमेंट फॅक्टर मिळत असून सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे किमान 18000 रुपये आहे. जर केंद्र सरकारच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्क्यांची वाढ करण्यात आली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 44 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच थेट 8000 ते 26 हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.