Gold-Silver Rate Today : सोन्याच्या भावात मोठा बदल ! वाचा आजचे सोने व चांदीचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold-Silver Rate Today : आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीने गेल्या आठवड्याभरात मोठी उचल खाल्ली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील सोने आणि चांदीने पहिल्यांदा सात महिन्यातील उच्चांक गाठला आहे.

या एकूण किमतींचा विचार केला तर यामध्ये तीन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलेली आहे. जर आपण इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन यांचा विचार केला तर त्यांनी जाहीर केलेल्या किमतीनुसार एका आठवड्यात सोन्यात 800 रुपये तर चांदीमध्ये पंचवीसशे रुपयांची वाढ झालेली आहे.

सहा ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव 56555 प्रति दहा ग्राम होता तर 13 ऑक्टोबरला दहा ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 58 हजार 396 रुपये होता. यामध्ये जर आपण वाढ पाहिली तर तब्बल 1841 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून येते.

तसेच चांदीचा विचार केला तर चांदीचा भाव 67204 रुपयांवरून 69 हजार 731 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदी देखील एका किलोमागे 2527 रुपयांनी वाढली आहे. याच अनुषंगाने आपण आजचे सोन्याचे बाजारभाव( मुंबई) किती आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत.

आज किती आहेत सोने आणि चांदीचे भाव

22 कॅरेट सोन्याचे भाव( मुंबई)- जर आपण आजचा 22 कॅरेट सोन्याचा प्रतिग्राम चा भाव पाहिला तर तो 5540 रुपये इतका आहे. काल हा भाव पाच हजार चारशे रुपये प्रति ग्राम इतका होता.म्हणजेच यामध्ये 140 रुपयांची वाढ झालेली आहे.

आठ ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव- 22 कॅरेटचे जर आठ ग्रॅम सोने घ्यायचे असेल तर आज तुम्हाला 44 हजार 320 रुपये मोजावे लागतील. काल हा भाव त्रेचाळीस हजार दोनशे रुपये इतका होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज तब्बल 1120 रुपयांनी वाढ झाली.

दहा ग्राम म्हणजेच एक तोळा 22 कॅरेट सोन्याचा भाव- 22 कॅरेटच्या दहा ग्राम सोन्याचा भाव आज 55 हजार चारशे रुपये आहे. काल हा भाव 54 हजार रुपये तोळा इतका होता म्हणजेच कालच्या तुलनेत आज तब्बल तोळ्यामागे 1400 रुपयांची वाढ झाली.

24 कॅरेट सोन्याचे आजचे बाजार भाव(मुंबई)- तुम्हाला जर एक ग्रॅम 24 कॅरेट सोने घ्यायचे असेल तर तुम्हाला आज सहा हजार 44 रुपये मोजावे लागतील. काल 24 कॅरेट सोन्याचा प्रतिग्राम दर हा 5891 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज 153 रुपये प्रति ग्राम मागे वाढ झाली.

आठ ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव- तुम्हाला जर 24 कॅरेटचे 8 ग्राम सोने आज खरेदी करायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला 48 हजार 352 रुपये लागतील. काल आठ ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 47,128 रुपये लागले. कालच्या तुलनेत आज आठ ग्रॅम सोन्याच्या भावामागे तब्बल 1224 रुपयांची वाढ झाली.

दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा 24 कॅरेट सोन्याचे भाव- तुम्हाला आज एक तोळा 24 कॅरेट सोने घ्यायचे असेल तर त्याकरिता साठ हजार 440 रुपये मोजावे लागतील. काल 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा भाव हा 58 हजार 910 रुपये इतका होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज तब्बल तोळ्यामागे 1530 रुपयांची वाढ झाली.