Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना ! व्याजतूनच होईल 1 लाखांपेक्षा जास्त कमाई !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात, गाव, शहर, जिल्हा इत्यादींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सहज उपलब्ध आहेत. या योजना सरकारद्वारे चालवल्या जातात, म्हणूनच येथिक गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देखील मिळतो. दरम्यान, जर तुम्हाला निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला यावरही उपाय देते.

पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मासिक उत्पन्न देखील मिळवू शकता. हे खाते तुमच्या जोडीदारासोबत म्हणजेच पती-पत्नी मिळून एकत्र उघडू शकता. म्हणजेच दोघेही संयुक्त खाते उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असे आहे.

या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून मासिक पैसे मिळवू शकता. तुमच्या जमा केलेल्या पैशावर तुम्हाला व्याज देखील मिळते आणि हे व्याज तुम्हाला दर महिन्याला मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक 9,250 रुपये पेन्शन देखील घेऊ शकता. या योजनेत तुम्ही सिंगल इन्व्हेस्टमेंट पर्याय निवडल्यास, तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडायचे असेल तर तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या ही सरकारी योजना ७.४ टक्के दराने व्याज देत आहे.

तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडल्यास, तुम्हाला १५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,11,000 रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हनूणजे दर महिन्याला तुम्हाला 9,250 रुपये पेन्शन मिळेल, हे फक्त तुमचे व्याजाचे पैसे असतील. तसेच पोस्ट ऑफिस योजनेत तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. यासोबत मॅच्युरिटीनंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही योजनेतील पैसे 5 वर्षांसाठी वाढवू शकता. हे खाते 3 लोक एकत्र उघडू शकतात.

तुमच्या माहितीसाठी पोस्ट ऑफिस मासिक योजना 5 वर्षात परिपक्व होते. ते वेळेपूर्वी बंद होऊ शकते. एका वर्षाच्या ठेवीनंतर पैसे काढता येतात. जर तुम्ही एक ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर 2 टक्के कपात केली जाते. तीन वर्षांनी पैसे काढल्यावर एक टक्का कपात केली जाते.