Bank Cheque Rules : चेक भरताना करू नका ‘या’ 7 चुका; अन्यथा, होऊ शकते मोठे नुकसान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Cheque Rules : सगळ्या बँका खाते उघडण्यासोबत चेक बुकची सुविधा देतात. ज्याचा वापर मोठ्या व्यवहारांसाठी केला जातो. मोठ्या प्रमाणात पैसे द्यायचे असतील किंवा कोणत्याही अधिकृत कामासाठी चेक द्यायचा असेल तर चेकबुक असणे फार आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे नाव, खाते क्रमांक इत्यादी माहिती असते, अशातच एखाद्याला चेक देताना स्वाक्षरी करणे फार महत्वाचे असते. स्वाक्षरी शिवाय कोणताही चेक स्वीकारला जात नाही.

तुमच्या स्वाक्षरीशिवाय चेक बँकेतून पुढे जात नाही. याशिवाय,  अशा काही चुका केल्याने तुमचा चेक बाउन्स होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्ही फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत.

चेक देताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !

चुकीच्या पद्धतीने सही करणे टाळा

अनेकदा तुम्ही घाईगडबडीत धनादेशावर सही करता, पण अशा स्थितीत तुमची सही चुकीची असू शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही चेकवर स्वाक्षरी करत असाल तेव्हा तुमचे सर्व काम बाजूला ठेवून त्यावर काळजीपूर्वक स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न करा. तुमची सही चुकीची असल्यास तुमचा चेक बाऊन्स होऊ शकतो.

कधीही कोऱ्या चेकवर सही करू नका

पुष्कळ लोक स्वाक्षरी करून धनादेश पुढे देतात. मात्र, तुमच्या या चुकीमुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. कधीही चेक देणाऱ्याचे नाव, तारीख आणि रक्कम लिहिल्यानंतरच चेकवर स्वाक्षरी करा, कोऱ्या धनादेशावर सही करणे टाळा.

एकच पेन वापरा

चेकमध्ये स्वाक्षरी, नाव, रक्कम इत्यादी तपशील भरण्यासाठी एकच पेन वापरा. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वेगवेगळ्या पेनचा वापर केला तर तुम्ही मोठ्या फळसवणुकीला बळी पडू शकता. म्हणूनच एकच शाईचा पेन वापरा.

स्वाक्षरी केलेला चेक कोणालाही देऊ नका

कोणालाही कोरा चेक कधीही देऊ नका. तुमचा कोणावर कितीही विश्वास असला तरी त्यांना तुमच्या स्वाक्षरीचा कोरा चेक कधीही देऊ नका. अशा परिस्थितीत, कोणीही तुमच्या चेकमध्ये रक्कम भरून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतो. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

चेकवर ‘फक्त’ लिहायला विसरू नका

धनादेशावर रक्कम लिहिण्याबरोबरच त्याच्या पुढे ‘फक्त’ लिहिली पाहिजे. फसवणूकीपासून संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे. जर तुम्ही कोणत्याही रकमेच्या पुढे ‘फक्त’ लिहिलं नाही तर फसवणूक करणारा त्यात जास्त रक्कम टाकू शकतो.

रद्द केलेले चेक द्या

जर तुम्हाला दस्तऐवज म्हणून खात्याच्या तपशीलासाठी धनादेश देण्यास सांगितले असेल, तर तुम्हाला कोरा किंवा स्वाक्षरी केलेला धनादेश देण्याची गरज नाही. अशा स्थितीत त्यावर Cancel लिहून चेक द्यावा.

फोन नंबरशिवाय चेक देऊ नका.

जेव्हा तुम्ही एखाद्याला स्वाक्षरी केलेला चेक देता तेव्हा नाव, रक्कम आणि इतर तपशीलांसह, चेकच्या मागील बाजूस तुमची स्वाक्षरी आणि बँकेशी जोडलेला फोन नंबर लिहा.