Best Business Idea: तुमच्याकडे स्मार्टफोन आणि बाईक असेल तर करा ‘हा’ व्यवसाय आणि दिवसात कमवा हजारो रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Business Idea:- तुमच्यात जर काही करायची उर्मी असेल तर तुम्ही कुठलाही व्यवसाय करून उत्तम पद्धतीने पैसे मिळवू शकतात. परंतु व्यवसाय करण्यासाठी अगोदर मनाची तयारी असणे खूप गरजेचे आहे. मनातून जर एखादा व्यवसाय करण्याची किंवा व्यवसायात उतरण्याची तयारी झाली तर माणूस त्या दिशेने प्रयत्न करतो हे मात्र नक्की.

तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर त्यासाठी आपल्याला पैशांची गुंतवणूक करावी लागते आणि आपल्याजवळ पैसा असणे खूप गरजेचे असते. या सगळ्या बाबी समोर ठेवूनच व्यक्ती व्यवसायाचा विचार करतो. परंतु यामध्ये असे अनेक व्यवसायांचे प्रकार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला जास्त पैशांची आवश्यकता न भासता देखील तुम्ही सुरुवात करू शकतात व चांगला पैसा मिळवू शकता.

याच पद्धतीने आपण जर पाहिले तर मोबाईल फोन आणि मोटरसायकल म्हणजेच बाईक यांच्या साह्याने तुम्ही असा एक व्यवसाय करू शकतात की त्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी पैसा किंवा अत्यल्प खर्चामध्ये चांगला नफा मिळवू शकतात व या व्यवसायाचे नावे आहे मेडिकल कुरिअर सर्विस होय. नेमका हा व्यवसाय काय आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 काय आहे मेडिकल कुरिअर सर्विस व्यवसाय?

हा असा व्यवसाय आहे की तुम्ही देशातील कुठल्याही शहरांमध्ये याची सुरुवात करू शकतात व तीही कुठल्याही जोखमी शिवाय. जर आपण मेडिकल कुरिअर सर्व्हिस या व्यवसायाचे स्वरूप पाहिले तर यामध्ये शहरात आपण बरेच कुटुंब पाहतो की त्या कुटुंबातील संपूर्ण लोक हे नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर असतात व अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरात असलेले जेष्ठ नागरिक मात्र घरामध्ये एकटे पडतात.

यातील बरेच ज्येष्ठ नागरिकांना काही ट्रीटमेंट चालू असतात व बऱ्याचदा अशा लोकांची औषधे संपतात. परंतु अशा लोकांना मेडिकल मधून औषध त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीच नसते. अशाप्रसंगी तुम्हाला संबंधित व्यक्तीकडून डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन घ्यावे लागते आणि मेडिकल स्टोर मधून त्यांचे औषध घेऊन ते संबंधित व्यक्तीपर्यंत म्हणजेच क्लाइंटपर्यंत पोहोचवावे लागते.

यासाठी तुम्हाला हा फॉर्म मेलच्या माध्यमातून किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवता येतो व तुम्हाला ते औषध खरेदी करून संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचवावे लागते. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या हातातील मोबाईल आणि तुमच्याकडे बाईक राहिली तर अगदी आरामात करू शकतात.

यामध्ये तुम्हाला संपूर्ण शहरात कुठेही फिरण्याची गरज नसून फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला फोन येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही सेवा द्यायला लागते. हा संपूर्ण नवीन स्वरूपाचा व्यवसाय असून तो आता मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. शहरातील अनेक लोक या माध्यमाचे स्टार्टअप उभारून चांगले पैसे मिळवत आहेत.

 अशा पद्धतीने मिळतो या व्यवसायात पैसा

यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला औषध पोहोचवण्याचे म्हणजेच औषध वितरणाच्या सेवेकरिता पैसे मिळतात. तसेच तुम्ही ज्या मेडिकल मधून दररोज औषधांची खरेदी करतात त्या ठिकाणाहून तुम्हाला क्रेडिट किंवा कमिशन मिळायला लागते. तसेच तुम्ही ग्राहकांकडून मेडिकल स्टोअरची बिले आणि सेवाशुल्क वसूल करू शकतात.

म्हणजेच तुम्हाला या माध्यमातून संबंधित ग्राहक आणि मेडिकल या दोन्हीकडून तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळते. तुमचा हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून याची जाहिरात करून तुमच्या सेवेबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकतात व मोठ्या प्रमाणावर व्यवसायाची वाढ करून चांगला नफा मिळवू शकता.