Post Office Savings Schemes : सरकारच्या “या” बचत योजनेत गुंतवणूक करून कमवा बक्कळ पैसा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Savings Schemes : एफडी गुंतवणुका अलीकडच्या काळात खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. सध्या सर्व बँकांनी व्याजदरात वाढ केल्यामुळे देखील गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास पसंती देत आहेत. एफडीसोबतच पोस्ट ऑफिस योजना देखील खूप प्रसिद्ध आहेत. बँकांमधील एफडी नंतर गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

अशातच तुम्ही देखील एफडी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा पोस्ट ऑफिस एफडी स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे 123 महिन्यांतच दुप्पट होतील. चला पोस्ट ऑफिसच्या खास योजेनबद्दल जाणून घेऊया-

किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी लोकप्रिय FD योजना आहे. अलीकडेच, किसान विकास पत्रावर मिळणारे व्याज सरकारने वाढवले ​​आहे, जे आता या FD योजनेतील पैसे 123 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे आणि 3 महिन्यांत दुप्पट करत आहे.

कोण येथे गुंतवणूक करू शकतो?

18 वर्षांवरील कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. याशिवाय, कोणताही पालक अल्पवयीन मुलाच्या नावावर हे खाते उघडू शकतो. पण लक्षात घ्या मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत त्याचे खाते पालकच चालवू शकतात. या खात्याची खास गोष्ट म्हणजे KVP मध्ये तुम्ही किमान 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

किसान विकास पत्रावरील व्याजदर

गेल्या काही महिन्यांत आरबीआयने व्याजदरात झपाट्याने वाढ केली आहे, त्यानंतर बँकांकडून एफडीवरील व्याजातही वाढ केली जात आहे. यामुळे सरकारने सप्टेंबरमधील तिसऱ्या तिमाहीत अल्प बचत योजनांवरील व्याजदरात 0.30 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीमध्ये KVP वर दिले जाणारे व्याज 0.1 टक्क्यांनी वाढवून 7 टक्के करण्यात आले आहे, जे पूर्वी 6.9 टक्के होते. एकूणच येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.