7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी मोठी वाढ, वाचा सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, गेल्या अनेक दिवसापासुन सुरु असलेल्या फिटमेंट फॅक्टरची मागणी आता लवकरच मंजूर होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच फिटमेंट फॅक्टरमध्ये लक्षणीय वाढ करेल अशी शक्यता वर्तवली जात असून, यासोबतच डीए थकबाकीचे पैसे सुद्धा खात्यात जमा करू शकते.

दरम्यान, गेले अनेक दिवस सुरु असलेल्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सरकारकडून वाढ मिळणार असल्याची शक्यता असून, यासोबतच डीए थकबाकीचे पैसे खात्यात जमा होण्याचेसुद्धा संकेत दिसतायेत.दरम्यान, जर या दोन्ही गोष्टींवर निर्णय सरकारने निर्णय घेतला तर हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाचे ठरेल.

केंद्रातील मोदी सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये लक्षणीय वाढ करू शकते, सध्या कर्मचाऱ्यांना 2.60 पट फिटमेंट फॅक्टरनुसार पगार मिळत आहे. तर तो आता आता 3.0 पटीने वाढविला जाणार आहे. दरम्यान, असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल.

इतकेच नाही तर काही रिपोर्ट्सनुसार मूळ वेतन थेट 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. यासह, मूळ वेतन वार्षिक 96,000 रुपयांनी वाढेल,ज्याचा फायदा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात झालेले नुकसान हे कारण देऊन गेले अनेक दिवस झाले सरकारने 18 महिन्यांची डीएची थकबाकी पाठवली नाही. दरम्यान, यात सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साडेतीन वर्षांचे पैसे आता खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे. मात्र सरकारकडून अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.