Bank Locker : BOB आणि SBI ग्राहकांसाठी अलर्ट ! 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Locker Agreement : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना बँक खात्यासोबत बँक लॉकरची देखील सुविधा पुरवते. बँक लॉकरमध्ये तुम्ही तुमच्या मौल्यावान वस्तू ठेवू शकता. प्रत्येक बँकेचे बँक लॉकर बाबत वेगवेगळे नियम असतात, तसेच त्यावर लावले जाणारे शुल्क देखील वेगवगेळे असतात. अशातच तुम्ही बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी बँक लॉकरबाबत एक महत्वाची बातमी आहे.

भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये बँक लॉकर असलेल्या ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँक संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांना बँक लॉकरसाठी नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. तुमचेही SBI किंवा बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत बँक लॉकर असल्यास, तुम्हाला तेथे जाऊन नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल, जर तुम्ही असे नाही केले तर तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

बहुतेक सर्व बँकांनी सुधारित बँक लॉकर करार जारी केला आहे ज्यात ग्राहकांचे हक्क समाविष्ट आहेत. बँक लॉकर ग्राहकांनी त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना फोन कॉल, एसएमएस आणि ईमेलद्वारे बँकेला भेट देण्यास सांगत आहेत. एवढेच नाही तर बँका ग्राहकांसाठी स्टॅम्प पेपरही ठेवत आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेत येऊन फक्त सही करावी लागेल. ग्राहकांना बँकेत जाऊन त्यांचा आधार, पॅन आणि फोटो द्यावा लागेल. तसेच, स्टॅम्प पेपर आणि बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल.

३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे लागेल हे काम !

RBI ने सर्व बँकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर धारकांसोबत नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांना आवश्यक माहिती प्रदान करण्याचे तसेच त्यांच्या लॉकर करारांची स्थिती RBI च्या कार्यक्षम पोर्टलवर अद्यतनित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बहुतेक लोक त्यांचे सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे बँक लॉकरमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षेसाठी करार करणे आवश्यक आहे.