Business Idea : अमुलची फ्रॅंचाईझी घेऊन तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात! कशी आहे व्यवसायाची प्रोसेस? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea :- व्यवसाय सुरू करत असताना स्वतः एखाद्या व्यवसायाची उभारणी करणे व त्यासाठी लागणारा खर्च, आवश्यक  परवानग्या आणि इतर महत्त्वाच्या बाबींची जुळवाजुळ ही स्वतः तुम्हाला करणे गरजेचे असते. परंतु या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या उत्तम आणि नावाजलेल्या ब्रँडची फ्रॅंचाईजी घेऊन संबंधित ब्रँड सोबत व्यवसाय उभा करून तो व्यवसाय चालवणे यामध्ये देखील खूप मोठा फायदा होऊ शकतो.

तुम्हाला यामध्ये स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याची गरज नसते. या प्रकारामध्ये तुम्ही ज्या एखाद्या ब्रँडची फ्रेंचाईजी घेता तो ब्रँड लोकप्रिय असतो व त्यामुळे तुमचा व्यवसाय देखील चांगला चालतो. याच पद्धतीने जर आपण अमुल डेअरी फ्रेंचाईजीचा विचार केला तर भारतातील एक सर्वात मोठा प्रसिद्ध डेअरी ब्रँड असून सोबत व्यवसाय करणे खूप फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये अमुल फ्रेंचाईजी घेण्याची प्रोसेस आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

 काय आहे नेमके अमूल?

१९४६ यावर्षी कैरा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव मिल्क प्रोडूसर युनियन लिमिटेड स्थापना झाली व यालाच अमूल म्हणून देखील ओळखले जाते. दुग्ध सहकारी संस्थांना प्रोत्साहन देऊन स्थानिक शेतकऱ्यांना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून अमूलची स्थापना करण्यात आलेली आहे.

डेअरी  उद्योगाचा कायापालट या माध्यमातून करण्यात आला. अनेक दशकांपासून गुणवत्ता तसेच नाविन्य आणि वैशिष्ट्यपूर्ण असे सहकारी मॉडेल राबवल्यामुळे अमुलने खूप मोठे यश मिळवले आहे. अमुल ब्रँडखाली दूध, लोणी, पनीर तसेच आईस्क्रीम सह इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात.

 अमुल फ्रॅंचाईजी घेण्यामागील महत्वाचे कारणे?

अमुल फ्रॅंचाईजी घेण्यामागील एक सर्वात मोठा फायदा म्हणजे हा एक प्रसिद्ध असा ब्रँड असून विश्वास गुणवत्ता या दृष्टिकोनातून ग्राहकांमध्ये हे प्रसिद्ध नाव आहे. विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ या माध्यमातून बनवले जातात व विकले जातात. अमुल ब्रँडची दुग्धजन्य पदार्थ चवीने देखील वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे सोबत तुम्ही व्यवसाय करायचे ठरवले तर पटकन तुम्ही चांगली ग्रोथ यामध्ये मिळवू शकतात. जेव्हा तुम्ही अमूलची फ्रॅंचाईजी घेतात तेव्हा तुम्हाला तुमचा व्यवसाय चांगला चालावा याकरिता सर्व आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील अमुलच्या माध्यमातून पुरवण्यात येते.

 अमुल फ्रेंचाईझी घेण्याची प्रोसेस

1- अगोदर जागेची निवड महत्त्वाची याकरता तुम्हाला ज्या ठिकाणी जास्त रहदारी किंवा गर्दी असते अशा ठिकाणी जागेची निवड करणे गरजेचे आहे. जसे की निवासी संकुले किंवा शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ इत्यादी गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जागेची निवड करू शकतात.

2- जवळच्या अमुल प्रादेशिक ऑफिसशी संपर्क साधणे तुम्हाला देखील अमूलचे फ्रेंचायझी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या अमुलच्या कार्यालयाशी संपर्क  साधने गरजेचे असून याकरिता लागणारी गुंतवणूक व अटी व शर्ती बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात येते.

3- कागदपत्रे अर्ज सादर करणे जर तुम्हाला अमूल फ्रेंचायसी घ्यायचे असेल तर याकरिता तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्याचा पुरावा आणि आर्थिक तपशील यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते व फ्रॅंचाईजी अर्ज देखील सादर करावा लागतो. भारतामध्ये तुम्ही नमूद केलेली माहिती अचूक असणे गरजेचे आहे.

4- मंजुरी आणि करारावर स्वाक्षरी तुमचा अर्ज व्हेरिफाय केल्यानंतर अमूल तुमची फ्रेंचाईजी मंजूर करेल व एकदा फ्रेंचाईजी  मंजूर झाल्यानंतर आवश्यक करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक असते व दोन्ही पक्षांच्या अटी व आवश्यक जबाबदाऱ्या दर्शवलेल्या असतात.

5- नंतर तुमचे आउटलेट व्यवस्थित सेट करणे– नंतर तुम्हाला आऊटलेट उघडायचे असेल तर यासाठी योग्य जागेची निवड करणे गरजेचे असून त्याचा शोध घ्या व अमुलच्या ब्रँडचे जे काही मार्गदर्शक तत्वे असतात ते व्यवस्थित स्थापित करणे गरजेचे आहे व तुमचा आऊटलेट स्वच्छ, टापटीपणा आणि दिसायला देखील आकर्षक आहे की नाही याची खात्री करावी.

6- लागणारे आवश्यक उपकरणे आणि सुरुवातीचा स्टॉक खरेदी करणे आऊटलेट करिता तुम्हाला काही आवश्यक उपकरणांची  गरज असते यामध्ये तुम्हाला रेफ्रिजरेटर आणि डिस्प्ले युनिट सारखे उपकरणे खरेदी करावे लागतात. ग्राहकांना ब्रँडचे विविध पदार्थांचे पर्याय देता यावेत याकरिता अमूलच्या उत्पादनांची श्रेणी तुम्हाला स्टॉक करणे गरजेचे असते.

7- मार्केटिंग आणि जाहिरात या पद्धतीने तुमचे आऊटलेट सुरू झाल्यानंतर त्याचे मार्केटिंग आणि जाहिरात करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही स्थानिक जाहिराती तसेच सोशल मीडिया आणि ओरल पब्लिसिटी इत्यादीचा वापर करून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकतात. कारण अमुल हा सगळ्यांना माहिती असलेला ब्रँड असल्यामुळे मार्केटिंग करिता तुम्ही थोडासा प्रयत्न  जरी केला तरी त्याचे यश तुम्हाला खूप लवकर मिळू शकते.

त्यामुळे अमुल फ्रॅंचाईजी घेऊन व्यवसाय सुरू करणे खूपच फायद्याचे ठरू शकते.