Business Success Story: ‘या’ तरुणाने शून्यातून निर्माण केले विश्व! 80 देशातील 800 शहरांमध्ये आहे हॉटेल व्यवसाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Success Story:- जर मनामध्ये जिद्द आणि काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा असेल तर व्यक्ती कितीही अडचणी आल्या तरी मोठा संघर्ष आणि परिस्थितीवर मात करत ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. असे अनेक उदाहरणे आपल्याला या समाजात दिसून येतात.

तसेच आपण भारतातील बऱ्याच उद्योजकांचा विचार केला तर अगदी शून्यातून या उद्योजकांनी त्यांचे आज विश्व निर्माण केले असून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांचे नाव आहे. साहजिकच इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नक्कीच नसतो. अनेक प्रकारच्या समस्यांचे काटे या रस्त्यावर असतात व हे पार करत आपल्याला त्याच्या पर्यंत पोहोचावे लागते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांची यशोगाथा पाहिली तर दिल्लीच्या रस्त्या रस्त्यांवर सिम कार्ड विकून पैसे मिळवणाऱ्या या तरुणाने अखंड मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर आज भारतातच नव्हे तर जगातील जवळपास 80 देशांतील 800 शहरांमध्ये हॉटेल व्यवसाय उभारला असून आज अब्जावधी डॉलरची संपत्ती उभी केली आहे. या लेखामध्ये आपण रितेश अग्रवाल यांची यशोगाथा पाहणार आहोत.

 सिम कार्ड विकणारा तरुण आहे आठ हजार कोटींच्या कंपनीचा मालक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 16 नोव्हेंबर 1993 रोजी ओरिसा राज्यातील कटक येथील बीसम या ठिकाणी एका सामान्य मारवाडी कुटुंबामध्ये रितेश अग्रवाल यांचा जन्म झाला. इतर आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या देखील आई-वडिलांची इच्छा होती की मुलाने चांगले शिक्षण घ्यावे व हीच आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात रितेश हे असताना मात्र त्यांना उद्योजक व्हायची इच्छा मनामध्ये तीव्र स्वरूपात होती.

शिक्षण घेत असताना ते शिक्षणासाठी दिल्लीला गेले व त्या ठिकाणी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतले. परंतु मनात उद्योजक होण्याचे सुरू असल्याने शिक्षणात मन रमले नाही व त्यांनी ते अर्धवट सोडले. त्यानंतर देखील घरच्यांनी आयआयटीच्या प्रवेशाची तयारी करिता त्यांना कोट्याला पाठवले.

परंतु रितेश अग्रवाल कोट्याला त्यासाठी गेले नाहीत व त्यावेळी त्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर सिम कार्ड विकण्याला प्राधान्य दिले. उद्योजक होण्याच्या प्रयत्नामध्ये 2012 या वर्षी पूर्वीच ओरिव्हल स्टेज नावाचे एक स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. परंतु हा स्टार्टअप यशस्वी झाला नाही. त्यामुळे दिल्लीला परत यावे लागले.

परंतु यावेळी मात्र फक्त तीस रुपये खिशात शिल्लक होते. परंतु काहीतरी उद्योग धंदा करावा हे आधीपासून मनात असल्यामुळे खिशात एक रुपया देखील नसताना सिम कार्ड विकायला सुरुवात केली.

 अशा पद्धतीने केली ओयो रूम्सची सुरुवात

प्रवासाची आवड असल्यामुळे जेव्हा जेव्हा अभ्यासातून त्यांना मोकळा वेळ मिळायचा त्यावेळी रितेश हे बाहेर फिरायला जायचे. याप्रमाणेच ते 2009 मध्ये डेहराडून आणि मसुरीला फिरायला गेलेले असताना त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहून ते मंत्रमुग्ध झाले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर रितेशच्या लक्षात आले की देशामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणी आहेत याबद्दल लोकांना अजून देखील काही माहिती नाही.

अशा ठिकाणांबद्दल लोकांना सांगितले पाहिजे असे त्याला वाटले व त्यानंतर रितेशने ऑनलाइन सोशल कम्युनिटी तयार करण्याचा विचार केला व एकाच प्लॅटफॉर्म लोकांना परवडणाऱ्या किमतीत सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात. या माध्यमातून लोकांना हवे त्या ठिकाणाची माहिती घेणे सोपे होईल व नवीन ठिकाणांना त्यांना भेट देता येणे शक्य होईल व या माध्यमातूनच रितेश अग्रवालला भविष्यातील त्यांचा हा व्यवसाय सापडला.

त्यानंतर 2013 मध्ये रितेश अग्रवाल यांची थील फेलोशिप करता निवड झाली व या माध्यमातून त्यांना 75 लाख रुपये मिळणार होते. या पैशांमधून रितेश यांनी ओयो रूम सुरू केल्या. परंतु हे सुरू करण्याआधी त्यांनी फार मोठ्या कालावधीकरिता याचा अभ्यास केला व सुरू केलेल्या कंपनीचे नाव ओरिव्हल स्टेस असं ठेवलं.

या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने स्वस्त दरात हॉटेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. आज जर आपण पाहिले तर जगातील 80 देशातील 800 शहरांमध्ये त्यांचा हॉटेल व्यवसाय सुरू असून अगदी तरुण वयामध्ये रितेश अग्रवाल हे आठ हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक बनले आहेत. आज जगभरात वेगाने जे काही व्यवसाय वाढत आहे त्यामध्ये त्यांच्या ओयोchi देखील गणना केली जात आहे.

अशा पद्धतीने मनात असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असली आणि त्यासाठी लागणारे कष्ट मनापासून करण्याची तयारी आपल्याला यशा पर्यंत पोहोचवू शकते हे रितेश अग्रवाल यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.