Cibil Score: कर्जाची सेटलमेंट केल्यावर सिबिल स्कोर खराब होऊ नये म्हणून काय करावे? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cibil Score:- बऱ्याचदा आपण घर बांधण्यासाठी होमलोन किंवा काही वैयक्तिक आर्थिक गरजा अचानकपणे उद्भवल्या तर पर्सनल लोनचा आधार घेतो. परंतु बऱ्याचदा काही कारणास्तव घेतलेल्या या कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये आपल्याला समस्या निर्माण होतात व हप्ते थकायला लागतात.  त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण व्हायला लागते. अशावेळी आपण बऱ्याचदा कर्ज सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतो किंवा हा पर्याय आपल्याकडे असतो.

परंतु आपण कर्जाचे हप्ते किंवा कर्ज का परतफेड करू शकत नाही याचे आवश्यक असे वैध कारण बँकेला देणे गरजेचे असते. तेव्हाच बँकेच्या माध्यमातून ओटीएस अर्थात वन टाइम सेटलमेंट करण्यात येते. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण कर्जाची सेटलमेंट करतो तेव्हा कर्जदार आणि कर्ज ज्या बँकेने दिलेली असते ती बँक यांच्यामध्ये काही वाटाघाटी होत असतात व एका विशिष्ट रकमेवर बँक व कर्जदार यांच्यामध्ये सहमती होते.

यामध्ये ज्या रकमेवर कर्जदार आणि बँक यांच्यामध्ये वाटाघाटी होऊन सहमती होते ती रक्कम एकाच वेळी म्हणजेच वन टाइममध्ये आपल्याला भरणे गरजेचे असते व त्यालाच बँकेच्या भाषेत वन टाइम सेटलमेंट म्हणतात. यामध्ये बऱ्याचदा कर्जाची जी काही मूळ रक्कम असते ती पूर्णपणे भरणे गरजेचे असते व थकीत रकमेवर लागलेले व्याज तसेच त्यावरील दंड, आणि इतर शुल्क हे अंशतः किंवा पूर्णपणे माफ करण्यात येते.

यामध्ये कर्जदाराला फार मोठा दिलासा मिळत असतो. परंतु या वन टाइम सेटलमेंटचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कर्जदाराचा क्रेडिट स्कोर हा मोठ्या प्रमाणावर घसरतो. मग आपल्याला माहित आहे की जर क्रिकेट स्कोअर खराब झाला तर भविष्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होऊ शकतात. अशाप्रसंगी कर्ज सेटलमेंट केल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ नये म्हणून काय करता येईल? यासंबंधीची माहिती या लेखात घेऊ.

 कर्ज सेटलमेंट केल्यावर क्रेडिट स्कोर खराब होऊ नये म्हणून काय करावे?

जेव्हा आपण कर्ज सेटलमेंट करतो तेव्हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये सेटलमेंटचा उल्लेख असतो. तेव्हा आपल्याकडून कर्जाची पूर्तता केली जाते तेव्हा कर्ज खात्यात सेटल लिहिलेले असते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही निर्धारित घेतलेल्या रकमेची परतफेड केलेली नाही किंवा कर्जदाराकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते. जर संबंधित कर्जदाराने भविष्यात कर्ज घेतले तर तो अशाच पद्धतीने करू शकतो असे या माध्यमातून गृहीत धरण्यात येते.

क्रेडिट हिस्टरी वर सेटल नोंदवले गेले तर त्याचा परिणाम हा क्रेडिट स्कोर कमी करण्यावर होतो. यामुळे तब्बल 50 ते 100 गुणांनी किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात क्रेडिट स्कोर घसरू शकतो. एका पेक्षा जर जास्त कर्ज खाती सेटल केलेले असतील तर क्रेडिट स्कोर जास्त प्रमाणात खाली येऊ शकतो. जर आपण या क्रेडिट अहवालाचा खाते स्थिती विभागाचा विचार केला तर यामध्ये सात वर्षांकरिता कर्जदाराच्या कर्जाची पूर्तता झाली आहे असे नमूद केले जाऊ शकते व अशा मुळे पुढील सात वर्षांसाठी पुन्हा कर्ज घेणे जवळपास अशक्य होऊन जाते व बँकेकडून काळ्या यादीत तुमचे नाव टाकले जाऊ शकते.

त्यामुळे कर्ज सेटलमेंट केली तर तुम्हाला पुन्हा कर्ज घेण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारला तरच ते शक्य होते. याकरता जेव्हा आपल्याकडे पैसे येतात म्हणजे जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो तेव्हा तुम्ही बँकेत जाता आणि म्हणता की तुम्हाला थकबाकीमध्ये जी काही सूट मिळाली आहे ती म्हणजे मुद्दल, व्याज,

दंड आणि इतर शुल्क इत्यादीवर म्हणजेच कर्ज सेटलमेंट दरम्यान तुम्हाला ज्या गोष्टींवर सवलत देण्यात आलेली होती त्यासाठी तुम्ही पैसे देणे गरजेचे आहे. त्यानंतर बँक तुमचे कर्ज पूर्णपणे बंद करेल आणि तुम्हाला बँकेकडून देय रक्कम न भरल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र घ्यायला विसरू नये.

सेटलमेंटमध्ये सेटल केलेली रक्कम तुम्ही भरल्यानंतर तुमची विश्वासार्हता वाढते व तुमचा क्रेडिट स्कोर देखील सुधारला जातो. म्हणजे सेटलमेंट केलेल्या रक्कम जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम  झाल्यावर भरली तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारला जातो.