तुम्हाला देखील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून व्यवसाय सुरू करायचा आहे का? घरबसल्या अशापद्धतीने करा कंपनीची नोंदणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजकाल नोकऱ्याची उपलब्धता कमी असल्यामुळे बरेच तरुण-तरुणी आता व्यवसायांकडे वळत असून यामध्ये अगदी छोट्या प्रमाणात देखील व्यवसाय सुरू केले जात आहेत तर काहीजण मोठ्या स्तरावर व्यवसाय सुरू करण्याच्या प्लॅनिंग मध्ये असतात. छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगदी घरात देखील व्यवसायाची सुरुवात करू शकतात.

परंतु जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या स्वरूपात व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला कंपनी स्थापन करून  व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरते. यामुळे बरेच फायदे देखील मिळतात. तुम्ही जर कंपनी स्थापन करून व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा फायदा तर मिळतोच.

परंतु व्यवसायाची वाढ देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करता येते. त्यामुळे एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून व्यवसाय करणे फायद्याचे ठरते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची एक स्वतंत्र कायदेशीर संस्था आहे जी कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयामध्ये रजिस्टर असते.

 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून व्यवसाय सुरू करण्याचे फायदे

1- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून तुम्ही तुमचा व्यवसाय केवळ मोठ्या स्तरावरच नेऊ शकत नाही तर अगदी विदेशामध्ये देखील त्याचा विस्तार करू शकतात.

2- तसेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत तुमचा व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल व तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर बँकेकडून कर्ज देखील तुम्हाला ताबडतोब मिळते.

3- यामध्ये तुम्हाला शंभर टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला देखील परवानगी मिळते.

4- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करायची असेल तर सदस्य संख्या किमान दोन आणि कमाल 200 असणे गरजेचे आहे व त्यासोबतच संचालकांची संख्या किमान दोन तर कमाल 15 असणे गरजेचे असते व भागीधारक अर्थात शेअर होल्डर्स दोन ते दोनशे पर्यंत असू शकतात.

 स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्यामध्ये जे लोक सहभागी होणार आहे त्या प्रत्येकाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ची प्रत

2- ज्या पत्त्यावर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नोंदणी करायची आहे त्या पत्त्याचा पुरावा किंवा प्रमाणपत्र

3- याकरिता आवश्यक जमीन किंवा घर भाड्याने घेत असाल तर संबंधित जमीन किंवा घर मालकाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र

4-mca.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अजून लागणारे इतर कागदपत्रांबद्दल माहिती घेऊ शकतात.

 अशाप्रकारे करा कंपनीची नोंदणी

प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नोंदणी प्रक्रिया खूप सोपी असून यामध्ये कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर घरबसल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. याकरिता तुम्हाला…

1- कंपनी स्थापन करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स च्या mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2- त्या ठिकाणी उजव्या बाजूला लिहिलेल्या साइन इन/ साइन अप वर जाऊन तेथे स्वतःची नोंदणी करावी लागेल.

3- यानंतर एमसीए सर्विसेस(MCA Services) वर क्लिक करावे आणि कंपनी सर्विसेस वर जावे.

4- या ठिकाणी विचारलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.

5- ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे वीस दिवसाचा कालावधी लागू शकतो.

कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी किती लागतो खर्च?

तुम्हाला देखील तुमचे स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करायची असेल तर याकरिता तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये पर्यंतचा खर्च येऊ शकतो.