Gold Loan Information: पैशांच्या इमर्जन्सीमध्ये तुम्हाला सोनेतारण कर्ज कसे ठरते फायद्याचे? वाचा सोनेतारण कर्ज घेण्याचे फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Loan Information:- आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा अचानक उद्धवतात किंवा बऱ्याचदा आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर व्यक्तीवर अचानक कोसळते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी माणसाकडे पैशांची पुरेशी बचत असते असे नाही. त्यामुळे बरेच जण मित्र किंवा नातेवाईक, सावकार इत्यादी कडून पैशांची तजवीज करतात.

तसेच दुसरा पर्याय म्हणून विविध बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून देखील कर्ज घेतात. यामध्ये बरेच जण वैयक्तिक कर्जाचा पर्याय अवलंबतात. परंतु आर्थिक संकटाच्या वेळी जर तुम्हाला पैसे अचानक लागत असतील तर तुम्ही तुमच्या घरात जर सोने असेल तर ते खूप मदत करू शकते.

आपल्याला माहित आहेच की अनेक प्रकारच्या बँका आणि एनबीएफसीच्या माध्यमातून सोन्याच्या बदलांमध्ये कर्ज सुविधा दिली जाते. तसे पाहायला गेले तर कर्जाच्या इतर पर्यायांपेक्षा सोन्यावर मिळणारे कर्ज हे फायदेशीर ठरते व त्यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात आहोत.

 गोल्ड लोन घेणे का असते फायद्याचे?

1- कमी नोटीसवर मिळते कर्ज अचानकपणे इमर्जन्सी उद्भवते व आपल्याला अशावेळी ताबडतोब पैसे लागत असतात. अशा आणीबाणीच्या प्रसंगी अल्प सूचनांवर कर्ज मिळणे खूप कठीण असते. परंतु तुम्ही गोल्ड लोनचा पर्याय वापरला तर तुम्हाला कमीत कमी नोटीसीवर म्हणजेच अल्प सूचनांवर कर्ज मिळते.

2- कर्जासाठी सुलभ निकष तुम्ही बँकेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून जे कर्ज घेतात त्याच्या निकषांपेक्षा गोल्ड लोनचे निकष हे खूप सोपे असतात. गोल्ड लोनमुळे तुमचा सिबिल स्कोर किंवा इतर आर्थिक क्रायटेरियामध्ये देखील खूप फरक पडताना दिसून येत नाही. तुम्ही देत असलेल्या सोन्याच्या किमतीनुसार तुम्हाला कर्ज दिले जाते.

3- कमी व्याजदरात मिळते कर्ज आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण पर्सनल लोन किंवा प्रॉपर्टी लोन किंवा कॉर्पोरेट कर्ज इत्यादी प्रकारच्या कर्जाचा पर्याय अवलंबतो किंवा इतर असुरक्षित कर्ज घेतो. या सगळ्या कर्जाच्या तुलनेमध्ये जर आपण सोने कर्ज म्हणजेच गोल्ड लोनचे व्याजदर पाहिले तर ते कमी असतात. म्हणजेच आपल्याला कमीत कमी व्याज दरात कर्ज मिळते.

4- कर्ज परतफेड करण्यासाठी मिळतात अनेक पर्याय तुम्ही जर गोल्ड लोन घेतले तर ते लोन परतफेड करण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध होतात किंवा दिले जातात. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही दरमहा फक्त व्याज देखील जमा करू शकतात.

 गोल्ड लोन घेण्यासाठी असलेल्या अटी

1- गोल्ड लोन घेण्याकरिता तुमचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 75 वर्ष दरम्यान असावे.

2- कर्जदाराला तारण किंवा हमी म्हणून देण्यासाठी सोने किंवा दागिने असणे गरजेचे आहे.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे तुम्ही सोने तारण देत आहात त्या सोन्याची शुद्धता 18 कॅरेट किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

 गोल्ड लोन घेताना नेहमी हे लक्षात ठेवा

तुम्ही गोल्ड लोन घेतले व त्या लोनची परतफेड जर वेळेवर केली नसेल तर संबंधित संस्था किंवा कंपनी तुमचे सोने विकू शकते व त्या प्रकारचा अधिकार त्यांना आहे. दुसरे म्हणजे जर सोन्याची किंमत कमी झाली तर कर्ज देणारा तुम्हाला जास्तीचे सोने गहाण ठेवण्यास देखील सांगू शकतो. त्यामुळे अल्प कालावधी करिता पैशांची गरज असेल तेव्हाच गोल्ड लोन घ्यावे.