Government Scheme: 10 लाख रुपये कर्ज मिळवा आणि 5 वर्षात फेडा! वाचा या योजनेच्या माध्यमातून कोणत्या उद्योगांसाठी मिळते कर्ज?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व अनेक योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता आर्थिक मदत केली जाते. अशा योजनांच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीची समस्या दूर करणे आणि  समाजातील आर्थिक दरी नष्ट करण्याच्या उद्देशाने अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अगदी याच पद्धतीने जर आपण केंद्र सरकारच्या योजनांचा विचार केला तर यामध्ये 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना एक महत्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून  सूक्ष्म व लघु उद्योगांकरिता तसेच इतर छोटे उद्योग व्यवसायांकरिता देखील कर्जाचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून कमाल दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. महत्वाच्या असलेल्या या योजनेबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 पंतप्रधान मुद्रा योजनेचे स्वरूप

या योजनेच्या नावांमधील जर आपण मुद्रा या शब्दाचा पूर्ण अर्थ पाहिला तर तो मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी असा होतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना असून या माध्यमातून लाभार्थ्यांना सूक्ष्म आणि लघुउद्योग उभारण्याकरिता कर्ज दिले जाते. यामध्ये तीन प्रकारचे कर्ज दिले जाते व हे नागरिकांना त्यांची गरज व श्रेणी यानुसार मदत करते.

विशेष म्हणजे हे सर्व कर्ज तुम्हाला कुठल्याही तारणाविना मिळते. या अंतर्गत मिळालेले कर्ज तुम्ही पाच वर्ष मुदतीत खेळू शकतात. किमान 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना त्यांच्या श्रेणीनुसार या योजनेत कर्ज मिळते.

जर आपण या योजनेचे उद्दिष्ट पाहिले तर देशामध्ये असे अनेक नागरिक आहेत की त्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु भांडवल असते. अशा परिस्थितीमध्ये ही योजना खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते व या अंतर्गत व्यक्तींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी  कर्ज सुविधा मिळत असल्यामुळे व्यक्ती त्याच्या स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभे राहू शकतो.

 पीएम मुद्रा योजनेचे कर्ज प्रकार

1- शिशु कर्ज या कर्ज श्रेणीमध्ये पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. हा कर्जाचा स्तर पाहिला तर तो अशा उद्योजकांकरिता आहे जे एक तर त्यांच्या प्राथमिक स्तरावर असतात किंवा ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्याला कमी पैशांची आवश्यकता आहे अशा व्यक्तींचा  या श्रेणीत समावेश होतो.

2- किशोर कर्ज या श्रेणीमध्ये 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. यामध्ये असे उद्योजक येतात ज्यांनी एक तर त्यांचा व्यवसाय याआधी सुरू केलेला आहे अस्तित्वात असलेला व्यवसाय वाढवायचा आहे व त्याकरिता त्यांना पैशांची आवश्यकता आहे.

3- तरुण कर्ज या वर्गामध्ये व्यक्तींना त्यांचा व्यवसाय सुरू करण्याकरिता पन्नास हजार ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. परंतु याकरिता काही आवश्यक पात्रता त्याच्यासाठी पूर्ण करणे गरजेचे असते व अटी पूर्ण केल्या तर दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी या माध्यमातून अर्ज करता येतो.

 या योजनेत कर्ज घेण्यासाठी कोण करू शकतो अर्ज?

त्यामध्ये स्वतःच्या मालकीचे व्यवसाय, सेवा क्षेत्रातील कंपन्या, भागीदारी तत्वावरील उद्योग व्यवसाय, सूक्ष्म  आणि लघुउद्योग, ट्रक इत्यादी वाहनाचे मालक, रिपेरिंग दुकानाचे मालक, अन्न उद्योग, किरकोळ विक्रेते यांना या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करता येतो.

 कोणत्या व्यवसायांना मिळते कर्ज?

पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत दुकानदार, फळे आणि भाजीपाला विक्रेता, कारागीर, शेतीशी संबंधित उपक्रम जसे की मासेमारी, कुक्कुटपालन, पशुपालन तसेच कृषी उद्योग एकत्रिकरण, दुग्ध व्यवसाय, कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र आणि त्यासोबत अन्न आणि कृषी प्रक्रिया इत्यादी.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड, कायमचा पत्त्याबद्दल तपशील, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, उद्योग व्यवसाय संबंधित कागदपत्रे, गेल्या तीन वर्षातील व्यवसायाची बॅलन्स शीट, अर्जदाराचे पासपोर्ट फोटो, इन्कम टॅक्स रिटर्न चे कागदपत्र, वयाचा पुरावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा कुठल्याही बँकेमध्ये डिफॉल्टर म्हणजेच थकबाकीदार नसावा.