शेअर बाजारातील ‘हे’ शेअर्स देणार बंपर परतावा ! अवघ्या काही महिन्यातच मिळणार जोरदार रिटर्न, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यानंतर भारतीय बाजारात चांगली तेजी आली.

या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. खरे तर शेअर बाजारात लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. लॉंग टर्म मध्ये शेअर्समधून चांगली कमाई होत असते. पण काही असेही स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पकालावधीतच चांगला परतावा देण्याची किमया साधली आहे.

काही कंपन्यांची यशस्वी घोडदौड त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरली आहे. अशातच शेअर बाजारातील काही तज्ञ लोकांनी गुंतवणूकदारांना काही शेअर्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञ चंदन तपरिया यांनी 3 अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे जें की येत्या काही महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता आहेत. अशा परिस्थितीत यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळू शकणार आहे.

कोणते शेअर्स देणार चांगला परतावा

एचसीएल टेक्नॉलॉजी : शेअर बाजार तज्ज्ञ चंदन तपरीया यांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचा स्टॉक येत्या काही महिन्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार आहे. हेच कारण आहे की, तपरिया यांनी या शेअर्ससाठी बाय रेटिंग दिले आहेत.

म्हणजे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरे तर सध्या एचसीएल टेक्नॉलॉजीचा स्टॉक १३७६ रुपयांवर ट्रेड करत आहे. पण येत्या काही महिन्यांमध्ये हा स्टॉक 1425 रुपयांवर जाईल असा अंदाज त्यांनी दिला आहे. तसेच यासाठी 1333 रुपयांचा स्टॉपलॉसही देण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बँक 

शेअर बाजार तज्ज्ञ चंदन तपरीया यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीसोबतच आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सवर सुद्धा विश्वास दाखवला आहे. त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. सध्या हा स्टॉक शेअर बाजारात 1017 रुपयांवर ट्रेड करत आहे. पण लवकरच यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा स्टॉक येत्या काही महिन्यात 1055 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. पण यासाठी 987 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

एसबीआय

एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या शेअर्सवर देखील शेअर बाजार तज्ज्ञ चंदन तपरीया यांनी विश्वास दाखवला आहे. त्यांनी एसबीआयच्या शेअर्ससाठी बाय रेटिंग दिली आहे.

सध्या हा स्टॉक शेअर बाजारात 618 रुपयांवर ट्रेड करत आहे. पण येत्या काही महिन्यात याची किंमत 642 रुपयांपर्यंत जाणार असा त्यांचा दावा आहे. तथापि यासाठी सहाशे रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.