Home Loan Tenure : होम लोन घेताना जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर तुम्हाला बसेल आर्थिक फटका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Tenure : प्रत्येकाला आपले स्वप्नातले घर खरेदी करावे वाटते. त्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करतात. परंतु काही जणांकडे घर खरेदी करताना पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे ते कर्ज घेतात. परंतु कर्ज घेण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

बँक ज्या कालावधीसाठी कर्ज ऑफर करत असते तो कालावधी 30 वर्षांचा असतो. परंतु आता 40 वर्षांपर्यंतची कर्जे उपलब्ध आहेत. यात तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गरजेनुसार गृहकर्जाचा कालावधी ठरवण्याची संधी दिली जाते. अनेकांना दीर्घ मुदतीसाठी गृहकर्ज घेणे सोपे वाटते, कारण कर्जाची EMI खूप कमी असतो.

त्वरित आर्थिक भार नसतो

कर्जाचा कालावधी म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ठरवण्यात आलेल्या समान मासिक हप्त्याने (EMI) संपूर्ण गृहकर्जाची परतफेड करण्याची वेळ. गृहनिर्माण कर्ज हे मोठे कर्ज असून येथे कर्जाची रक्कम मोठी असते. त्यामुळे कर्जाची संपूर्ण रक्कम एकाच वेळी फेडणे जिकरीचे काम असते. कर्ज परतफेडीचा कालावधी जास्त असेल तर लोकांवर त्वरित आर्थिक भार पडत नाही.

कर्ज परतफेडीचा दीर्घ कालावधी म्हणजे ज्याने कर्ज घेतले असेल, त्याला दीर्घकाळापर्यंत परतफेड करावी लागणार आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या 40 वर्षांच्या कर्जासाठी 30-37 वर्षांची व्यक्ती 70-75 वर्षांची होईपर्यंत कर्जाची परतफेड करते. निवृत्तीनंतर पैसे कसे भरणार याचा विचार करणे महत्त्वाचे असते.

असा होईल EMI कमी

कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवण्याचा फायदा असा आहे की गृहकर्जाची ईएमआय प्रत्येक महिन्याला कमी होते. त्यामुळे कर्ज परवडण्याजोगे होते, कारण कर्जावरील EMI ची रक्कम ठरवत असताना प्रत्येकजण प्रथम त्यांच्या उत्पन्नाच्या आधारावर ते परवडणारे आहे की नाही हे पाहत असतो. असे होऊ शकते की एखाद्या व्यक्तीला मोठ्या कर्जाची रक्कम गरजेची आहे, जर ती 20 ते 25 वर्षांच्या कालावधीसाठी असल्यास EMI रक्कम खूप जास्त असेल.

अधिक व्याज

समजा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी मोठ्या रकमेचे कर्ज घेतल्यास त्याचा तुम्हाला फटका बसेल. यामुळे व्याज वाढते. विविध बँकांमधील कर्जाच्या व्याजदरातही तफावत असून कर्ज घेण्यापूर्वी, खर्चाचे विश्लेषण करावे. कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत उपलब्ध असणाऱ्या निधीतून तुम्ही कर्जाची काही रक्कम परत करू शकता.

लक्षात ठेवा या गोष्टी

गृहकर्ज घेत असताना कर्जाची रक्कम आणि त्याची परतफेड करण्याची पद्धत याबाबत स्पष्ट धोरण पाहिजे. समजा कर्जाची रक्कम मोठी असल्यास परतफेडीचा कालावधी मोठा असेल तर त्याचा परिणामही मोठा असतो. कर्जाची परतफेड कशी होईल याची काळजी घ्या.

अशा परिस्थितीत कर्जाची काही रक्कम परतफेड करणे फायदेशीर राहू शकते. व्याजाची रक्कम तुम्हाला कमी करता येईल. अनेकजण ईएमआय रक्कम किंवा व्याजदर पाहून कर्ज घेतात. व्याजदर वाढत असेल तर तुम्हाला तुमच्या गणनेत त्यानुसार कर्जाची किंमत आणि परिणाम समाविष्ट करावा लागणार आहे.

व्याजदराच्या आघाडीवर गोष्टी व्यवस्थित होत नसल्यास तर त्याच्या आर्थिक स्थितीवर कोणताही दबाव येत नाही हे ठरवण्याची व्यक्तीला पूर्ण संधी असावी. दीर्घकालीन कर्ज किफायतशीर वाटते, परंतु त्याची किंमत जास्त आहे.