दिवसाला 34 रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवा, 35 लाखांपेक्षा अधिकची रक्कम मिळवा, कशी आहे ही योजना ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Plan : अलीकडे गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. आपल्या देशात फार पूर्वीपासूनच बचत करण्याला महत्त्व आहे. अधिक कमाई करणाऱ्या पेक्षा अधिक बचत करणाऱ्याला आर्थिक साक्षर म्हणून ओळखतात. लोक अलीकडे संसाराचा गाडा चालवून दरमहा शिल्लक राहणारी रक्कमेची फक्त बचतच करत आहेत असे नाही तर अशी रक्कम आता गुंतवली देखील जात आहे. यामुळे पैसा आणखी मोठा होतोय.

खरे तर देशात गुंतवणुकीसाठी आजही बँकेतील एफडी, एलआयसी आणि पोस्ट ऑफिस च्या योजना यालाच विशेष प्राधान्य दिले जात आहे. मात्र यामधून मिळणारा परतावा हा काहीसा कमी असतो. यामुळे काही लोक गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडची देखील निवड करत आहेत. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी अर्थातच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनने गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांचा फंड जमा केला आहे.

म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी द्वारे दर महिन्याला एक ठराविक अमाऊंटची गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंड निश्चितच शेअर बाजाराशी संबंधित आहे. मात्र असे असले तरी यामधील जोखीम ही तुलनेने कमी आहे. म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळणार हे फिक्स नाही. तथापि काही शेअर बाजार तज्ञांनी म्युच्युअल फंड मध्ये सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळतो असा दावा केला आहे.

एसआयपीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये पहिल्या दिवसापासूनच चक्रवाढ व्याजेचा फायदा मिळतो. यामुळे एसआयपी केल्याने पैसे वेगाने वाढतात. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्ही येथे किमान पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

दरम्यान आज आपण एसआयपी मध्ये दिवसाला 34 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून अर्थातच महिन्यासाठी एक हजार रुपयांची गुंतवणूक करून कशा तऱ्हेने 35 लाखांचा मोठा फंड जमा केला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

असा जमा होणार 35 लाखांचा फंड

जर तुम्ही दर महिना 1000 रुपयाचे एसआयपी केले तर बारा महिन्यात तुमचे बारा हजार रुपयाची गुंतवणूक होणार आहे. जर तुम्ही ही एसआयपी सलग तीस वर्षे सुरू ठेवली तर तुमची गुंतवणुकीची अमाऊंट ही तीन लाख 60 हजार रुपये एवढी होईल.

जर या गुंतवणुकीवर 12% चे रिटर्न मिळालेत तर तीस वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीवर 31 लाख 69 हजार 914 रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहेत. अशा तऱ्हेने तुम्ही दरमहा एक हजार रुपये गुंतवूण तीस वर्षांनी 35 लाख 69 हजार 914 जमवू शकणार आहात.