Investment Tips: करोडपती बनवण्यासाठी 555 चा फार्मूला आहे फायद्याचा! वाचा याबद्दल ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips:- पैसा कमावणे आणि त्या कमावलेल्या पैशांची योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करणे या गोष्टींना भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा कमावलेला पैसा तुम्ही कशा पद्धतीने आणि कुठे गुंतवता? या गोष्टींना खूप महत्त्व आहे.

पैसा जगण्याचे साधन आहे आणि त्या पैशाची गुंतवणूक करणे त्यामुळे खूप गरजेचे आहे. पैसे गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना किंवा पर्याय बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये योग्य प्रकारे पैशांची गुंतवणूक करणे व त्या दृष्टिकोनातून मिळणारा परतावा पाहणे हे खूप गरजेचे असते.

त्यामुळे या लेखात आपण 555 चा एक फार्मूला बघणार आहोत जो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या निवृत्तीच्या आधीच तुमचे बरेच स्वप्न पूर्ण करू शकतो  व तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून स्वातंत्र्य अनुभवू शकतात.

 काय आहे नेमका 555 चा फॉर्मुला?

555 चा फार्मूला जर पाहिला तर हा तुमच्या वयावर अवलंबून असून तो साधारणपणे वयाच्या 25 वर्षापासून सुरू होतो. या फॉर्मुल्यानुसार तुम्हाला तीस वर्ष गुंतवणूक करावी लागते आणि प्रत्येक वर्षी तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीच्या रकमेमध्ये पाच टक्क्यांनी वाढ करावी लागते.

म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षापासून तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करता व प्रत्येक वर्षाला पाच टक्क्यांनी त्यामध्ये वाढ करतात. जर तुम्ही अशा पद्धतीने सतत 30 वर्षापर्यंत गुंतवणूक केले तर तुम्ही वयाचे 55 वर्षाचे व्हाल व तोपर्यंत ही गुंतवणूक करत राहा.

म्हणजेच 55 वर्षापर्यंत सतत पाच टक्के दराने गुंतवणूक वाढ करत  गुंतवणूक करणे या धोरणालाच 555 चा फार्मूला म्हणतात. या फार्मूल्यानुसार तुम्ही तीस वर्षानंतर कोट्यावधीचे मालक होऊ शकतात.

 त्यानुसार तुम्ही किती पैशांपासून करू शकतात गुंतवणुकीला सुरुवात?

555 चा फार्मूला वापरून तुम्ही दोन हजार रुपयांपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमचे वय 55 वर्ष होईल तेव्हा तुम्ही स्वतःला करोडपती बनवू शकतात. मध्ये तुम्ही 25 वर्षाचे झाल्यापासून एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. एसआयपी एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेने खूप चांगला असा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

सरासरी 12% परतावा या एसआयपीच्या माध्यमातून मिळतो असे गुंतवणूक तज्ञ देखील म्हणतात. या एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. समजा तुम्ही यामध्ये रुपयाचे 25 व्या वर्षी दोन हजार रुपयांनी एसआयपी सुरू केली

त्यामध्ये प्रत्येक वर्षी पाच टक्क्यांची वाढ केली तर तीस वर्षात तुम्ही एकूण पंधरा लाख 94 हजार पाचशे बत्तीस रुपये गुंतवणूक कराल व 12 टक्के दराने व्याजाच्या रूपात तुम्हाला तब्बल 89 लाख 52 हजार 280 रुपयांचा परतावा मिळेल. तरी तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी एकूण एक कोटी पाच लाख 46 हजार 812 रुपयांचे मालक बनू शकतात.

तसेच तुम्ही या फार्मूल्यासह पाच हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही दोन कोटी 63 लाख 67 हजार 30 रुपयांचे मालक व्हाल. त्या पद्धतीने हा फार्मूला वापरून तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार गुंतवणूक करू शकतात.