Investments Plans : कोट्यधीश होण्याचं स्वप्न होईल पूर्ण, येथे करा गुंतवणूक….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Investments Plans : आज प्रत्येकजण मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करत आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्या लोकांना आपल्या गुंतवणुकीबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाही त्यांच्यासाठी ही गुंतवणूक उत्तम आहे. याशिवाय येथे व्याजाची रक्कमही चांगली मिळते.

मुदत ठेवीची सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिसकडून दिली जाते. सध्या सर्व बँका FD वर वेगवेगळे व्याजदर देत आहेत. अशातच जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय बाजरात आणखी काही पर्याय आहेत, जेथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा कमावू शकता, तसेच तुम्हाला येथे सुरक्षितता देखील मिळते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चक्रवाढ व्याजही मिळते. याशिवाय, यामध्ये गुंतवणूक केल्यास कर लाभ मिळतो. सध्या पीपीएफमध्ये ७.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. येथील गुंतवणूक देखील सर्वात सुरक्षित गुंतवणुकीपैकी एक आहे.

पीएफ

नोकरदार लोकांसाठी पीएफ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. इतर बचत योजनांच्या तुलनेत ते जास्त व्याज देतात. यामध्ये लोकांना चक्रवाढ व्याजही मिळते. आतापर्यंत पीएफमध्ये ८.१५ टक्के दराने व्याज दिले जात आहे.

एसआयपी

एसआयपी हा लोकांसाठी चांगला गुंतवणूक पर्याय आहे. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही एसआयपी करू शकता. येथील गुंतवणूक ही जोखमीची असली तरी देखील तुम्ही म्युच्युअल फंडाद्वारे येथे गुंतवणूक करू शकता. सध्या कमीत कमी जोखीम असलेले अनेक फंड आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. एसआयपी मध्ये मिळणार परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे. दीर्घकाळात, एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी करोडो रुपयांचा निधी जमा केला आहे.