Multibagger Share : शेअर नव्हे कुबेराचा खजाना ! एक हजारांवर गेला 6 रुपयांचा शेअर, 10 हजारांचे झाले 16 लाख रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

United Spirits Ltd Share Price : शेअर मार्केट अशी जागा आहे जेथे थोड्या गुंतवणुकीवर अतिश्रीमंत होता येते. काही शेअर्सवरील रिटर्न असे असतात की त्या आधारे गुंतवणूकदार श्रीमंत होऊन जातात.

पण यासाठी धैर्य, शांती, संयमाची गरज आहे. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर लॉन्‍ग टर्म गुंतवणूक ठेवली तर लॉटरीही लागू शकते.

असच काहीस झालं आहे ब्रिटीश बहुराष्ट्रीय कंपनी डियाजिओच्या मालकीच्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (यूएसएल) सोबत. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरने सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 16 हजार टक्के र‍िटर्न दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने हे शेअर्स खरेदी केल्यानंतर विकले नसतील तर 10,000 रुपयांची गुंतवणूक आता 16 लाख रुपये झाली असती. होय 22 वर्षांपूर्वी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा शेअर 6.55 रुपये होता. गुरुवारी बंद सत्रात हा शेअर 1,057.75 रुपयांवर पोहोचला आहे.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,097.40 रुपये आणि नीचांकी स्तर 730.90 रुपयांवर होता. कंपनीने उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील आपले 200 वर्षे जुने युनिटही बंद केले आहे. ही कंपनी मॅकडॉवेल, रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, जॉनी वॉकर आणि ब्लॅक डॉग या नावाने मद्यनिर्मिती करते.

गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सहा महिन्यांत या शेअरने सुमारे 35 टक्के परतावा दिला आहे. शाहजहांपूर युनिट बंद करण्यासंदर्भात कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाने बहुवर्षीय पुरवठा साखळी कार्यक्षमता कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शाहजहांपूर युनिट बंद केले आहे.

* शेअर्समध्ये धैर्य महत्वाचे

शेअर्स मार्केटमध्ये धैर्य महत्वाचे असते. जर एकदा गुंतवणूक केली व ती दिर्घकाळ ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. असे अनेक उदाहरणे आहेत की दहा, पंधरा वर्षाच्या कालावधीत त्या शेअर्सने लोकांना करोडपती केले आहे. त्यामुळे बऱ्याचदा म्हटले जाते की शेअर्समध्ये गुंतवणूक करा व विसरून जा. कारण दीर्घकाळणे तुमची ही गुंतवणूक अनेक पटींनी वाढलेली असते.