Less Investment Business: कमी खर्चात भरघोस नफा मिळवायचा तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय! नोकरीची नाही पडणार गरज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Less Investment Business:- जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार येतो तेव्हा सगळ्यात अगोदर व्यवसायासाठी लागणारे भांडवल म्हणजेच पैशांचा विचार केला जातो. कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत विचार करत असताना कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा कोणता व्यवसाय देईल? याचा प्राधान्य क्रमाने विचार केला जातो.

यामध्ये जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे. त्यामुळे अशा मोठ्या यादीतून व्यवसायाची निवड करताना बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. परंतु नेमके त्या व्यवसायाला असलेली बाजारपेठेतील मागणी किंवा स्कोप आणि लागणारी गुंतवणूक याचा विचार करून जर तुम्ही व्यवसायाची निवड केली

तर नक्कीच कमीत कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळणे शक्य आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशाच एका व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याला आजकाल बाजारात खूप मोठी मागणी आहे व ती कालांतराने वाढत जाणारी आहे.

 सुरू करा मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय

सध्याच्या कालावधीमध्ये मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसायाला खूप चांगले दिवस आले असून दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. मोबाईल आणि त्याच्याशी संबंधित असलेली इयरफोन, चार्जर, ब्लूटूथ, विविध प्रकारच्या आवश्यक केबल तसेच लाइटिंग स्पीकर,

कार्ड रीडर, मोबाईलचा स्टॅन्ड तसेच साऊंड बार स्पीकर अशा अनेक ॲक्सेसरीज बाजारामध्ये आले आहेत. या उत्पादनांना दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून व्यवसायाला सुरुवात केली तर कालांतराने खूप चांगला पैसा या माध्यमातून मिळवू शकतात.

 या गोष्टींची काळजी घ्या आणि मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करा

हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जसे की, आज-काल कोणत्या गोष्टी जास्त ट्रेंडमध्ये आहेत किंवा तरुणांमध्ये कोणत्या गोष्टींची क्रेझ जास्त आहे  अशा गोष्टींचा शोध तुम्ही घ्यावा व त्यानंतर व्यवसायासाठी अशा वस्तूंची खरेदी करावी.

तसेच एका वेळेला जास्त किंवा अनेक वस्तूंची खरेदी करू नये. दुकानासाठी मोबाईल ॲक्सेसरीज खरेदी करताना त्या वेगवेगळ्या श्रेणीतील खरेदी कराव्यात. त्यामुळे ग्राहकांना जर एखादी ॲक्सेसरीज किंवा वस्तू घ्यायची असेल तर विविध प्रकारचे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत नक्कीच ग्राहक कुठली ना कुठली एक वस्तू किंवा उत्पादन तुमच्याकडून खरेदी करेल.

 कोणत्या जागी सुरू करावा हा व्यवसाय?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोबाईल ॲक्सेसरीज व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जागेची गरज भासत नाही. एखाद्या सार्वजनिक बाजारपेठेच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी छोटासा स्टॉल लावून देखील सुरुवात करू शकतात

किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी फिरून देखील हा व्यवसाय करता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमची नोकरी वगैरे सांभाळून अर्धवेळ देखील हा व्यवसाय करू शकतात.

 मोबाईल ॲक्सेसरीज व्यवसायातून मिळतो चांगला नफा

या व्यवसायाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या खर्चापेक्षा दोन ते तीन पट जास्तीचा नफा या माध्यमातून मिळतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही एखादी वस्तू 12 रुपयाला खरेदी केलेली असेल तर ती तुम्ही पन्नास रुपयाला सहजपणे विकू शकतात.

व्यवसायाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा हा व्यवसाय आहे. जास्तीत जास्त पाच हजार रुपये गुंतवणूक करून देखील तुम्ही सुरुवात करू करू शकतात.कालांतराने जसे जसे तुमचा व्यवसाय वाढत जाईल व तुमचे उत्पन्न वाढेल तसे तसे तुम्ही यामध्ये गुंतवणूक वाढवत जाऊन व्यवसायात वाढ करू शकतात व अधिकचा नफा मिळवू शकतात.